आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समाजोपयोगी कार्यक्रम:मुस्लिम शादीखान्याकरिता 25 लाख रूपयांचा निधी

मेहकर15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आमदार डॉ.संजय रायमूलकर यांच्या वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी कार्यक्रम मेहकर व लोणार येथे घेण्यात आले. यावेळी नीरज रायमूलकर मित्र मंडळाच्या वतीने वाढदिवस साजरा करण्यात आला. यानंतर सकाळी शारंगधर बालाजी मंदिर, स्वामी समर्थ मंदिर, गजानन महाराज मंदिर येथे आ.रायमूलकर यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला. तर युवा सेनेच्या वतीने नगर परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना बसण्यासाठी , डेक्स बेंच वाटप, मुस्लिम समाज बांधवाच्या शादी खाण्यासाठी २५ लाख रुपयांचे निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे स्वागत करण्यात आले.

यावेळी अध्रुड सरपंच संघटनेचे अध्यक्ष डॉ.नंदकिशोर देशमुख यांनी आ.रायमूलकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत वृक्षारोपणाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच गावातील सभा मंडपाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी माजी कृषी सभापती जि.प.राजुमामा पळसकर, उपतालुका प्रमुख समाधान साबळे, खरेदी-विक्री संघाचे संचालक भागवतराव देशमुख हे उपस्थित होते. यानंतर शारंगधर अर्बन क्रेडिट सोसायटीच्या वतीने आ.संजय रायमूलकर यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी पंजाबराव मेटांगळे, विजेंद्र धोंडगे, नीरज रायमुलकर,अंबादासजी सस्ते, पंजाबराव धांडे, शिवशंकर तेजनकर, शंकरराव ठाकूर, शालिक डव्हळे, नागेश सोनुने, रविराज राहटे, आकाश सास्ते, भूषण घोडे, अक्षय तांगडे, धनंजय देशमुख, वरद ठाकूर, गणेश बेंडमाळी, माजी नगराध्यक्ष संजय जाधव , तालुकाप्रमुख सुरेशतात्या वाळूकर, नीरज रायमुलकर, भूषण घोडे, समाधान साबळे,रविराज राहटे, प्रशांत साबळे, साबीर गवळी, हर्षल गायकवाड, शुभम राऊत,भगवान बचाटे, मनीष वानखेडे ,रवी बऱ्हाटे,अक्षय तांगडे, शुभम खोकले यांच्यासह आदी मान्यवरांची उपस्थिती होती. तर सायंकाळी मेहकर शहरातील मुस्लिम बांधवांच्या वतीने, इमाम बडा चौकामध्ये आ.रायमुरकर यांची लाडू तुला करण्यात आली. यावेळी सिकंदर मौलाना, तौफिक कुरेशी, शेखलाल कुरेशी, रफिक भाई कुरेशी व मुस्लिम बांधव उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...