आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीक्षा:मानवाच्या कल्याणासाठी 26 वर्षाचा शुभम सांखला घेणार जैन धर्माची दीक्षा

देऊळगाव मही2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर जग असताना मानवाने सर्वच क्षेत्रात प्रगती केली आहे. परंतु प्रगती करूनही आजच्या आधुनिक युगात धन दौलत आराम, पारिवारिक सुख तसेच जीवनातील सर्व सुख-सुविधा उपभोगण्यासाठी तसेच मिळवण्यासाठी मनुष्य सतत धडपडत असतो. मानवी जीवन असंख्य सुख सुविधा लाभ मिळवूनही समस्त मानवी जीवन दुखी आहे. या सर्व सुख सुविधेचा त्याग करून जैन धर्माचा प्रसार, अध्यात्मिक सुख, समस्त मानव जीवनाच्या कल्याणासाठी उच्चशिक्षित असलेला शुभम पारसमल सांखला हे संपूर्ण जीवन दिगंबर बनून देवाच्या शरण जात आहेत.

युग प्रधान आचार्य महाश्रमणजी यांच्या आशीर्वादाने शुभम सांखला ८ डिसेंबर रोजी सिरीयारी राजस्थान येथे दीक्षा घेत आहेत. अवघ्या सव्वीस वर्षीय असलेले शुभम सांखला यांना लहानपणापासून अध्यामाची आवड असल्याने अनेक वर्ष गुरू महाराजांच्या सानिध्यात राहून ते अध्यात्माचे तसेच समस्त मानव जातीच्या कल्याणाचे धडे घेतले आहेत.

त्यांनी कठोर तपश्चर्या करून तसेच कठीण व्रत धारण करून गुरू महाराजांच्या आज्ञेनुसार नुसार मानव कल्याणाचा उपदेश तसेच जैन धर्माचे तंतोतंत पालन करून जैन धर्माचा प्रसार करणार आहेत. याप्रसंगी शुभम सांखला यांची शुक्रवार रोजी देऊळगावमही येथे मिरवणूक काढण्यात आली. सर्व जाती धर्माच्या नागरिकांनी मिरवणुकीत सहभागी होऊन शुभम यांचे आशिर्वाद घेऊन त्यांना भावी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...