आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सामूहिक विवाह:सामूहिक विवाह सोहळ्यात 28 जोडपी विवाहबद्ध; बौद्ध धम्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन ८ मे रोजी श्रीहरी लॉन्स येथे करण्यात आले

खामगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने बौद्ध धम्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन ८ मे रोजी श्रीहरी लॉन्स येथे करण्यात आले होते. या विवाह सोहळ्यात २८ जोडी विवाहबद्ध झाली. या कार्यक्रमाचे उद्घाटक भारतीय बौद्ध महासभेचे माजी राज्य संघटक भीमराव तायडे होते तर स्वागताध्यक्ष वंचित बहुजन आघाडीचे पार्लमेंटरी बोर्ड सदस्य अशोक सोनोने होते.

यावेळी महाथेरो भदंत विनयपाल, उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल कोळी, तहसीलदार अतुल पाटोळे, नायब तहसीलदार हेमंत पाटील, ठाणेदार अरुण परदेशी, ठाणेदार सतीश आडे,वंचितचे जिल्हाध्यक्ष गणेश चौकसे, राजाभाऊ भोजने, तेजेंद्रसिंग चव्हाण, विठ्ठल लोखंडकार, प्राचार्य धनंजय तळवणकर, संतोष डिडवाणीया, राजेश राजोरे, भारतीय बौद्ध महासभा जिल्हाध्यक्ष एस. एस. वले, न. ल. खंडारे, एस. डी. मोरे, डॉ.अनिल वानखडे, रामकृष्ण रजाने, उर्मिला तायडे, विशाखा सावंग, अनिता डोंगरे, डॉ. राजकुमार सोनेकर, एम. टी. इंगळे, डॉ. वसंत डोंगरे, दादाराव हेलोडे उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...