आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अटक:बनावट प्रमाणपत्र तयार केल्याप्रकरणी वकिलासह 3 अटकेत

मलकापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील पार पेठ भागातील एका ऑनलाईन चालकाने व वकिलाने संगनमत करून एसटी बॅच बिल्ला बनवण्यासाठी बनावट डोमिसाईल प्रमाणपत्र डिजिटल स्वाक्षरीद्वारे बनवून दिले. या प्रकरणी नायब तहसीलदार बाळासाहेब सुभाष दराडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यातील तिन्ही आरोपींना शहर पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. त्यांना शनिवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपींना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

शहरातील पार पेठ भागातील आजम खान अयुब खान (२७) यास एसटी चालक पदासाठी बॅच बिल्ला काढण्यासाठी डोमीशियल प्रमाणपत्र काढावयाचे होते. यावेळी ॲड. मो. वसीम मो. मुस्ताक (३१) याने पैसे घेऊन सै. साजीद सै. नुरोद्दीन (३१) याच्याशी संगनमत करून तहसीलदारांची बनावट डिजिटल स्वाक्षरी करून दाखला बनवून दिला. हा दाखला घेऊन आजामखान अयुबखान बॅच बिल्ला बनवण्यासाठी कागदपत्रे घेऊन मागील ६ एप्रिल रोजी नायब तहसीलदार बाळासाहेब सुभाष दराडे यांच्याकडे गेला असता सदरचा डोमीशियल बनावट दिसल्याने त्यांनी या बाबतची तक्रार शहर पोलिसात दिली.

या तक्रारीवरून शहर पोलिसांनी आरोपी आजामखान अयुबखान, ॲड. मो.वसीम मो. मुस्ताक, सै. साजीद सै. नुरोद्दीन या तिन एकाविरुध्द गुन्हा दाखल केला. दरम्यान त्यांना १३ मे रोजी रात्री अटक केली. आरोपींना १४ मे रोजी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आजमखान अयुबखान यास न्यायालयीन कोठडी तर ॲड.मो.वसीम मो.मुस्ताक, सै.साजीद सै.नुरोद्दीन ऑनलाईन चालक या दोघांना तिन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक सुखदेव भोरकडे हे करत आहे.

बातम्या आणखी आहेत...