आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोकड लंपास:तांदुळवाडीत 3 घरफोड्या, दागिन्यांसह रोकड लंपास; घराच्या पाठीमागील बाजूचे दरवाजे तोडून लंपास

मलकापूर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दसरखेड एमआयडीसी पोलिस स्टेशन अंतर्गत असलेल्या तांदुळवाडी येथे अज्ञात चोरट्यांनी तीन ठिकाणी घराच्या पाठीमागील बाजूचे दरवाजे तोडून सोन्या चांदीच्या दागिन्यांसह रोख लंपास केल्याची घटना आज ३ एप्रिल रोजी सकाळी सहा वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे.

उन्हाळ्याचे दिवस असल्याने ग्रामस्थ अंगणात किंवा गच्चीवर झोपले असल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी तांदुळवाडी गावातील तीन घरांचे दरवाजे पाठीमागून तोडून घरामध्ये प्रवेश केला. घरात प्रवेश करुन घरातील सोने-चांदीचे दागिने व रोख रक्कम घेऊन चोरटे पसार झाल्याची झाले आहे. ही घटना आज ३ एप्रिल रोजी सकाळी सहा वाजे सुमारास उघडकीस आली. पोलिस पाटील श्रीकृष्ण बोरले यांनी याबाबतची माहिती दसरखेड एमआयडीसी पोलिसांना दिली.

विनायक जगन्नाथ बोरले हे सहकुटुंब रात्री घरासमोरील अंगणात झोपलेले असताना त्यांच्या घराचा मागील दरवाजा,अशोक सुखदेव फेंगडे हे कुटुंबासह गच्चीवर झोपलेले असताना घराचा मुख्य दरवाजा तोडला तर तिसऱ्या घटनेत सिंधुबाई बारसू झनके यांच्या घराचा पाठीमागील दरवाजा तोडून चोरट्यांनी घरात घुसून कपाटातील दागिने व नगदी रोख रक्कम लंपास केली.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक आनंद महाजन घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी विनायक बोरले रा.तांदुळवाडी यांनी दिलेल्या तक्रारीवरून त्यांचे व अशोक फेंगडे, सिंधुबाई झनके या तिघांच्या घरांचे दरवाजे तोडून कपाटातील सोने-चांदीचे दागिने व नगदी रोख रक्कम असा ९२ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला असल्याची तक्रार दिली. पुढील तपास बीट जमादार पो.हे.कॉ विजय टेकाडे करीत आहे.

बातम्या आणखी आहेत...