आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतीक्षा:उमरगा-लोहाऱ्यात 3 मध्यम प्रकल्प 100 %, 13 साठवण तलाव फुल्ल ; पाणीपातळीत काही भागात वाढ

उमरगा25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

उमरगा व लोहारा तालुक्यांत यंदा सप्टेंबरच्या ५ तारखेपर्यंत सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. त्यामुळे उमरगा तालुक्यातील तीन मध्यम प्रकल्पांसह ४३ लघु व साठवण तलावांपैकी १३ तलावांमध्ये १०० टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.उस्मानाबाद पाटबंधारे विभाग क्रमांक-२ अंतर्गत उमरगा-लोहारा तालुक्यात तीन मध्यम प्रकल्प व ४३ लघु प्रकल्प व साठवण तलाव आहेत. तालुक्यात जून महिन्यापासून पाच सप्टेंबरपर्यंत झालेल्या पावसाने सरासरीच्या अधिक पाऊस झाला आहे. गतवर्षी ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे तलावाच्या पाणीपातळीत काही भागात वाढ झाली आहे.तरीही अनेक गावांना पिण्यासाठी पाणीपुरवठा करणाऱ्या मध्यम प्रकल्पांमध्ये पाणीसाठा झालेला नाही. त्यामुळे जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. परंतु ऑगस्टमध्ये सततच्या अतिपावसाने सर्वत्र शेतशिवारात पाणी साचले. तसेच सखोल भागात पाणी साचून नदी, ओढे वाहत होते.

उमरगा-लोहारा तालुक्यात यंदा जोरदार पाऊस झाला. त्यामुळे तीन मध्यम प्रकल्प शंभर टक्के भरले आहे. यामुळे उन्हाळ्यात तहान भागविण्यासाठी उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. परंतु अद्याप पावसाळा संपला नसल्याने मोठा पाऊस होण्याची आशा आहे. उमरगा व लोहारा तालुक्यात ४३ लघु प्रकल्प व साठवण तलाव आहेत. दोन तालुक्यात आतापर्यंत झालेल्या जोरदार पावसामुळे उमरगा तालुक्यात दगडधानोरा, कोळसूर, मुरळी कसगी, वागदरी, भिकारसांगवी, कोरेगाव, आलूर, अचलेर व लोहारा तालुक्यात लोहारा, भोसगा, जेवळी क्रमांक एक, हिप्परगा-रवा ही १३ तलाव शंभर टक्के भरले आहेत. बलसूर क्रमांक एक, कोरेगाववाडी, नारंगवाडी, तलमोडवाडी, डिग्गी व बेलवाडी तलावात ९० टक्क्यांवर पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. कदेर, सरोडी, एकुरगा, बलसूर क्रमांक-दोन, अचलेर, धानुरी, माळेगाव, हिप्परगा रवा या आठ तलावात ७५ टक्क्यांवर पाणीसाठा झाला आहे. दाळिंब, काळ निंबाळा, पेठ सांगवी, कसमलवाडी, कुन्हाळी, भुसणी, केसर जवळगा क्रमांक एक व दोन, आलूर या ९ तलावात ५० टक्क्यांवर पाणीसाठा उपलब्ध आहे. गुंजोटी, कदेर, गुंजोटीवाडी, रामनगर व जेवळी क्रमांक दोन या पाच तलावात ५० टक्क्यांखाली पाणीसाठा उपलब्ध आहे. कोराळ तलावात २० टक्के व सुपतगाव तलावात केवळ १० टक्के पाणी उपलब्ध आहे.

उमरग्यात ६३० तर लोहाऱ्यात ४९० मिली पाऊस
उमरगा तालुक्यात जून ते पाच सप्टेंबरपर्यंत पाच मंडळ विभागात अपेक्षित पाऊस ३९१ मिलिमीटर इतका असताना तब्बल ६३० मिलिमीटर पाऊस झाला आहे. लोहारा येथे तीन मंडळ विभागात पाच सप्टेंबरपर्यंत अपेक्षित पाऊस ३८२ मिलिमीटर होणे गरजेचे असताना ४९० मिलिमीटर इतका पाऊस झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...