आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भ्रष्ट कारभार:जिल्ह्यातील 308 ग्रामसेवकांनी केली 244 प्रकरणांत अफरातफर ;काही प्रकरणे प्रलंबित, पंचायत राज समितीने घेतला होता आढावा

बुलडाणा6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

लेखा परीक्षणात घोळ केलेल्या दहा वर्षापूर्वीची प्रकरणे २४४ आहेत. अफरातफर केलेल्या अशा ग्रामसेवकांची संख्या ३०८ इतकी असून यातील एका प्रकरणाची अजूनही खाते चौकशी सुरुच आहे. तर प्रकरण सुरु असताना ११ ग्रामसेवकांना निलंबित करण्यात आले होते. ही प्रकरणे तत्कालीन पंचायत राज समितीच्या दौऱ्यातही उघडकीस आली होती. आता पुन्हा एकदा पंचायत राज समितीचा दौरा आला म्हणजे सध्या सुरु असलेल्या अफरातफर प्रकरणातील ग्रामसेवक निलंबित करण्याची किंवा चौकशी करण्याची जाग जिल्हा परिषदेला येणार आहे. तोवर वरिष्ठांचा हाथ ग्रामसेवकांच्या साथ राहणार आहे.

सध्या २०२०-२१ व २०२२ ची लेखा परीक्षणे सुरुच आहेत. दांडी बहाद्दर ग्रामसेवकांनी अजूनही अनेक ठिकाणी आपला पदभार दुसऱ्याला दिला असला तरी महत्वाची कागदपत्रे मात्र दिली नसल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे अशा ग्रामपंचायतींची चौकशी अद्यापही तशीच आहे. ग्रामसेवकांची प्रकरणे निधीच्या कामात अफरातफर करण्याची बहुतांश प्रकरणात आहे. तक्रारी केल्यानंतरही अशा ग्रामसेवकांकडून अधिकारी मॅनेज करण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे ग्रामसेवकाला सेवानविृत्त होईपर्यंत कोणत्याही चौकशीला सामोरे जावे लागत नाही. अशी अनेक प्रकरणे सध्या जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेत प्रलंबित आहेत. दहा वर्षांपासून ही प्रकरणे फक्त पुढे ढकलत आली आहे. आता तर दहा वर्षातील अफरातफरीची प्रकरणे बाहेर आली आहेत. ज्यामध्ये २४४ प्रकरणांची संख्या असून ३०८ ग्रामसेवक अडकलेले आहेत. त्यातील चार बडतर्फ झाले आहेत. एकाची पोलिस स्टेशनला तक्रार झाली आहे. एकाची खाते चौकशी सुरु आहे. सात जणांची वेतनवाढ रोखली आहे. ८० ग्रामसेवकांना पुन्हा अफरातफर न करण्याची ताकद देण्यात आली आहे. ५२ ग्रामसेवकांचा मृत्यू झाला आहे.

मयत ग्रामसेवक व सेवानविृत्त असे : मयतांमध्ये बुलडाणा, खामगाव, मलकापूर प्रत्येकी २, लोणार ३४, जळगाव जामोद ३, नांदुरा १, शेगाव३, चिखली ४ ग्रामसेवक आहेत. सेवानविृत्त झालेले चिखली ५२, लोणार ३२, खामगाव ११, बुलडाणा ४, जळगाव जामोद २, मलकापूर, लोणार व नांदुरा प्रत्येकी एक, शेगाव ७ ग्रामसेवकांचा समावेश आहे.

वित्तआयोगाच्या निधीत विशेष भ्रष्टाचार
सध्या चौदाव्या व पंधराव्या वित्त आयोगाचा निधी वाटप केला जात आहे. या निधीमधून अनेक कामे केली जातात. कामे करतानाच नेमकी अफरातफर होते. गावातील लोक असा प्रकार उजेडात आणतात अन् तोंड बंद करुन ही प्रकरणेही बंद पडतात. काही प्रकरणे लेखा परीक्षणात उघडकीस येतात. परंतु, त्याकडे मात्र लक्ष दिले जात नाही. अशाच अफरातफरीची प्रकरणे जिल्हा परिषदेत प्रलंबित का राहतात. गेल्या दहा वर्षांपासून अशा प्रकरणात लक्ष का दिले गेले नाही.

पंचायत समितीनिहाय प्रकरणे व जबाबदार ग्रामसेवक
बुलडाणा येथे १६ प्रकरणे व ३३ ग्रामसेवक, ८ प्रकरणे व ७ ग्रामसेवक, मलकापूर ५ प्रकरणे व ५ ग्रामसेवक, नांदुरा ४ प्रकरणे ४ ग्रामसेवक, लोणार १११ प्रकरणे ७७ ग्रामसेवक, मेहकर ३ प्रकरणे ६ ग्रामसेवक, शेगाव ५ प्रकरणे १३ ग्रामसेवक, चिखली ७६ प्रकरणे १३९ ग्रामसेवक, खामगाव १६ प्रकरणे २४ ग्रामसेवक आहे. एकाच ग्रामपंचायतीत त्याच प्रकरणात अनेक वेळा बदलून आलेले ग्रामसेवक गोवले गेले आहेत.

अशा आहेत कार्यवाही : बडतर्फीमध्ये नांदुरा १, चिखली १ व खामगाव २, पोलिस केस खामगावच्या प्रकरणाची आहे. तर खाते चौकशीही खामगाव पंचायत समिती अंतर्गतच आहे. वार्षिक वेतन वाढ रद्द करण्यात आलेल्या ग्रामसेवकांमध्ये बुलडाणा पंचायत समिती ११, लोणार, मेहकर व खामगावचे प्रत्येकी २, दोन वेतनवाढ बंद करण्यात आलेले मेहकर व खामगाव प्रत्येकी १ व चिखलीचे पाच प्रकरणे आहेत. ताकीद देण्यात आलेले ग्रामसेवक बुलडाणा १६, चिखली ४२, खामगाव ४, लोणार ९, शेगाव ३,जळगाव जामोद व मलकापूर येथील प्रत्येकी २, नांदुरा येथील एक प्रकरण आहे.

बातम्या आणखी आहेत...