आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबँकेतून पैसे काढून घरी परतत असलेल्या एका ७३ वर्षीय वृद्धाच्या अंगावर घाण टाकून थैलीतून ४० हजार रुपये चोरट्यांनी लंपास केले. शुक्रवारी दुपारी ही घटना मुख्य रस्त्यावरील निर्मल टर्निंगजवळ घडली.जळगाव जामोद तालुक्यातील मडाखेड येथील वसंता नारायण नाये हे खामगाव येथील एका खासगी कंपनीत नोकरीवर होते. सेवानिवृत्तीनंतर त्यांना विमा पॉलिसीची मिळालेली रक्कम काढण्यासाठी ते खामगाव येथे २९ जुलै रोजी आले होते. यावेळी भारतीय स्टेट बँकेतून ४० हजार रुपयांची रक्कम काढल्यानंतर मडाखेड येथे जाण्यासाठी पायी बसस्थानकावर निघाले. दरम्यान ते बसस्थानकातील मुत्रीघराकडे लघुशंकेसाठी गेले.
परत येताना अज्ञातांनी त्यांच्या अंगावर घाण पडल्याचे सांगितले. बसस्थानकाच्या दुसऱ्या बाजूला पाणपोई आहे, तेथे तुम्ही शर्ट धुवून घ्या, असे सांगत वृद्धाला नळावर जाण्यासाठी प्रवृत्त केले. या वेळी शर्ट धुण्यासाठी थैली लटकवल्याची संधी साधत चोरट्याने वृद्धाचे ४० हजार रुपये थैलीतून लंपास केली व थैलीतील कागदपत्रे खामगाव-शेगाव रस्त्यावर फेकून दिले. या प्रकरणी शहर पोलिसांनी चाेरट्याविरोधात गुन्हा दाखल केला. दरम्यान, वृद्धाचे महत्वपूर्ण कागदपत्रे २९ जुलै रोजी सायंकाळी उपजिल्हा सामान्य रुग्णालयात कार्यरत असलेल्या डॉ. उदयसिंह राजपूत यांना खामगाव-शेगाव रोडवर सापडली. दस्तावेजावरील पत्ता आणि मोबाइल क्रमांकावरून सुरुवातीला त्यांनी मडाखेड येथील परिचितांशी संपर्क केला. याप्रकरणी पोलिस तक्रार झाल्याचे समजताच वृद्धाचा दस्तावेज त्यांनी शहर पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षकांचे रायटर संतोष वाघ यांच्याकडे सुपूर्द केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.