आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणरायाची स्थापना:मानाचा चांदीच्या गणपतीला 48 वर्षाची परंपरा ; प्रबोधनात्मक कार्यक्रमांची दहा दिवस असते रेलचेल

चिखलीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील राजकीय व सामाजिक घडामोडींचा तसेच इतिहासाचा मूक साक्षीदार असलेल्या राजा टॉवर येथे स्थापन केला जाणारा गणपती समस्त चिखलीकरांसाठी आस्थेचा, श्रद्धेचा आणि कुतूहलाचा आहे. याठिकाणी जय गणेश मंडळाद्वारे गेल्या ४८ वर्षांपासून गणेशाची स्थापना केली जाते.

जय गणेश मंडळ हे चिखलीतील सर्वात जुन्या गणेश मंडळापैकी एक गणेश मंडळ आहे. राजा टॉवर भागातील अठरापगड जाती-धर्मांतील व्यापारी, व्यावसायिकांनी ४८ वर्षांपूर्वी एकत्र येत येथे गणरायाची स्थापना केली होती. त्यांंचाच वारसा या भागातील सचिन बोंद्रे, श्रीकांत टेहरे, भारत दानवे, दीपक श्रीवास्तव, बंटी शेटे, मोहन खंडेलवाल, राजू पांडे, राजू नसवाले, राजू लहाने, गणेश भूजबळ, संजय सुराणा, रवींद्र तोडकर, नीरज चौधरी, सागर डहाके आदी मंडळींकडून जोपासना होत आहे. गणेशोत्सव काळात दरवर्षी नवोपक्रम राबवण्यासाठी हे मंडळ प्रसिद्ध आहे. गणेशोत्सवकाळात विविध सामाजिक, अध्यात्मिक, क्रीडा उपक्रमांसह प्रबोधनात्मक कार्यक्रमांची मोठी रेलचेल असते. सन १९९९ मध्ये या गणेश मंडळाने १९ किलो चांदीची गणेश मूर्ती बनवून घेतली आहे. तेव्हापासून याच मूर्तीची स्थापना या मंडळाद्वारे दरवर्षी केली जाते. जुने गणेश मंडळ तसेच मानाचा गणपती या नावाने या गणेश मंडळाच्या गणरायाची ख्याती असल्याने गणेशोत्सव काळात या गणरायाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी होते. यंदा मंडळाचे ४८ वे वर्ष आहे. आणखी एका वर्षानंतर मंडळाला ५० वर्षे पूर्ण होणार आहेत. त्या अनुषंगाने आतापासूनच तयारी चालवली आहे. मंडळाचे ५० वे वर्ष भव्य-दिव्य पद्धतीने साजरे केले जाणार आहे, अशी माहिती जय गणेश मंडळाचे माजी अध्यक्ष सचिन बोंद्रे यांनी दिली आहे.

२३ वर्षांपासून चांदिच्या मूर्तीची स्थापना जय गणेश मंडळाने १९९९ मध्ये पुण्यातील प्रसिद्ध दगडूशेठ हलवाई गणपतीची प्रतिकृती असलेली चांदीची गणेश मूर्ती बनवली. त्यावेळी ही मूर्ती १८ किलो वजनाची होती व त्यावेळी चांदीला असलेल्या बाजारभावानुसार ही मूर्ती बनवण्यासाठी अडीच लाख रुपये खर्च आला होता. २०१३ मध्ये मूर्तीच्या वजनात ५७९ ग्रॅमची भर टाकण्यात आली. सध्या ही मूर्ती १९ किलोची आहे. दरवर्षी या गणेशमूर्तीची स्थापना मंडळाद्वारे करण्यात येते. तर विसर्जनासाठी देखील एक मोठी गणेशमूर्ती या मंडळाद्वारे स्थापन केली जाते.

सन २०२२ ची कार्यकारिणी : प्रतीक टेहरे अध्यक्ष, नवरतन सोळंकी उपाध्यक्ष, संकेत बोंद्रे सचिव, पवन राऊत सहसचिव, कोषाध्यक्ष गोपाल गोलानी, प्रसिद्धीप्रमुख अरुण बावने, मूर्ती रक्षक गणेश वाघ आदींचा समावेश आहे.

बातम्या आणखी आहेत...