आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना अपडेट:बुलडाणा जिल्ह्यात कोरोनाचे 614 अहवाल निगेटिव्ह, तर 2 पॉझिटिव्ह; सावध राहण्याचे आवाहन

बुलडाणा4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवलेल्या व रॅपिड चाचणी द्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण ६१६ अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यापैकी ६१४ अहवाल कोरोना निगेटिव्ह असून २ अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये रॅपिड चाचण्यांचा अहवालांचा समावेश आहे.

निगेटिव्ह अहवालांमध्ये प्रयोग शाळेतील १४ तर रॅपिड टेस्टमधील ६०० अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे ६१४ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह आलेल्या अहवालामध्ये बुलडाणा तालुक्यातील धाड येथील १ व चिखली तालुक्यातील धोत्रा येथील १ अशाप्रकारे जिल्ह्यात २ नवीन कोरोना संशयित व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आली आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत ८१४०४२ अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत ९८३३३ कोरोना बाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना सुटी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुटी देण्यात आलेल्या रुग्णांची एकूण संख्या ९८३३३ आहे.

आज रोजी ८० नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल ८१४०४२ आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण ९९०४६ कोरोनाबाधित रुग्ण असून त्यापैकी ९८३३३ कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सद्यस्थितीत कोविडचा उपचार घेत असलेले २५ रुग्ण आहेत. तसेच आजपर्यंत ६८८ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...