आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील श्रावणबाळ, संजय गांधी निराधार योजनेच्या ६२१ प्रकरणांना मंजुरी देण्यात आली आहे. तालुका संजय गांधी निराधार समितीच्या बैठकीचे आयोजन समिती अध्यक्ष समाधान सुपेकर यांनी बुलडाणा जिल्हा कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन केले होते. तर मंजुर प्रकरणांचे प्रमाणपत्र ग्रामीण तथा शहरी परीसरातील पात्र लाभार्थ्यांपर्यंत थेट पोहोचवण्यात आले आहे.
तालुक्यातील पात्र लाभार्थ्यांना उपरोक्त योजने अंतर्गत लाभ मिळावा यासाठी तहसील कार्यालयात संजय गांधी निराधार व श्रावण बाळ योजनेची नुकतीच सभा पार पडली. या सभेत संजय गांधी निराधार योजनेची ११० तर श्रावणबाळ योजने अंतर्गत ५११ अशा सुमारे ६२१ प्रकरणांना मंजुरी देण्यात आली.
या अध्यक्षस्थानी समितीचे अध्यक्ष समाधान सुपेकर तर प्रमुख उपस्थितीत तहसीलदार अजितकुमार येळे, नायब तहसीलदार खाडे, नगर परिषदेचे इंगळे, विस्तार अधिकारी राठोड, ठाकुर यांच्यासह समितीचे सदस्य नीलेश अंजनकर, रवि तोडकर, बाबुराव सोनुने, ज्योती प्रकाश चव्हाण, शेख रफिक, परमेश्वर सावळे, नामदेव सदार, प्रकाश चव्हाण यादीसह अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.