आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समाजभान:आरोग्य शिबिराचा ६४७ नागरिकांनी घेतला लाभ; महिलांना मिळाली संधी

बुलडाणाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

येथील बुलडाणा अर्बन कर्मचारी गणेशोत्सव मंडळाच्या वतीने विविध उपक्रम यावेळी राबवण्यात आले. यामध्ये आयोजित आरोग्य शिबिराचा लाभ ६४७ नागरिकांनी घेतला. तर महिलांच्या कलेला संधी मिळवून देण्यासाठी पूजा थाली व रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्‌घाटन संस्थेचे चीफ मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. सुकेश झंवर व कोमल झंवर यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला बुलडाणा अर्बन चे अध्यक्ष राधेश्याम चांडक यांचे मार्गदर्शन लाभले.

आरोग्य शिबिरात हृदयरोगांसाठी डॉ. सुमित शेजोळ, मूळव्याधीसाठी डॉ. आनंद औटी औरंगाबाद, मणक्याचे विकार तज्ञ डॉ. अक्षय गादिया औरंगाबाद, दंत मुख रोग तज्ञ डॉ. शरद काळे बुलडाणा, मेंदू विकार व मानसोपचार तज्ञ डॉ. महेश बाहेकर बुलडाणा, बाल मनोविकार तज्ञ व स्त्री मनोविकार तज्ञ डॉ. लता बाहेकर, नेत्ररोग तज्ञ डॉ. शोन चिंचोले, न्यूट्रिशन तज्ञ डॉ. साधना भवटे, स्त्रीरोग तज्ञ डॉ. संजीवनी वानेरे, दंत सौंदर्य, दंत शल्य तज्ञ डॉ. रश्मी काळे, चेस्ट मेडिसिन तज्ञ डॉ. दीपक काटकर, औषधी तज्ञ डॉ. राजू कोठारी, नाक कान घसा तज्ञ डॉ. आनंद देशपांडे व अस्थिरोग तज्ञ डॉ. वीरेंद्र काटकर हे उपस्थित होते. प्रत्येक तज्ज्ञाचा वेगळा टेबल असल्याने ज्यांना ज्या आजाराची तपासणी करावयाची सुकर झाले होते.

या शिबिरात तब्बल ६४७ नागरिकांनी तपासणी केली, अशी माहिती मंडळाचे आरोग्य समिती प्रमुख मोहन दलाल, गजानन चवरे, राजेंद्र वानेरे, व सर्व कार्यकारिणीच्या सदस्यांच्या वतीने देण्यात आली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बुलडाणा अर्बन कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. बुलडाणा अर्बन कर्मचारी गणेशोत्सव मंडळाच्या वतीने आयोजित रांगोळी व पूजा थाली स्पर्धा महिला-मुलींच्या कलागुणांना वाव मिळणारी ठरली.

या स्पर्धेला अनंता देशपांडे, डॉ. साधना भवटे,डॉ. संजीवनी वानेरे आदींची उपस्थिती होती. या रांगोळी स्पर्धेचे खास वैशिष्ट्ये जसा साडीचा पदर तशीच रांगोळी काढायची असे होते. या अवघड स्पर्धेचे विजेते प्रथम क्रमांक किरण कथने, द्वितीय क्रमांक दोन स्पर्धकांना विभागून देण्यात आला यात नीता साळवे, कविता सुर्यवंशी, तृतीय क्रमांक विभागून देण्यात आला यात गायत्री देशपांडे व पूजा चिंचोले यांना तर प्रोत्साहनपर नेहा कायस्थ यांना देण्यात आला. रांगोळी स्पर्धेचे निरीक्षक म्हणून अमोल शेळके, सुनीता पुजारी हे होते.

पूजाथाली स्पर्धेचे प्रथम विजेते पल्लवी पठले, द्वितीय शारदा मराठे,तृतीय कविता सूर्यवंशी देण्यात आले. प्रोत्साहनपर पूजा चिंचोले यांना देण्यात आले. पूजाथाली चे निरीक्षक म्हणून सोनाली कुलकर्णी, ज्योती पाटील यांनी काम पाहिले. या स्पर्धेसाठी कर्मचारी वर्षा राजपूत, विद्या निकम, वर्षा खिर्डीकर, सुनीता जाधव, दीपाली उगले, सपना जाधव यांनी मोलाचे सहकार्य केले.

स्पर्धा व्यवस्थित पार पाडण्यासाठी बुलडाणा अर्बन कर्मचारी गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष गजानन पाटील, उपाध्यक्ष अभय पावडे, सचिव श्रीकांत जोशी,संजय राजगुरे, अजय पाटील, मोहन दलाल,गजानन चवरे, राजेंद्र वानेरे, कैलास मोरे, सचिन शास्त्री, प्रशांत काळवाघे, नीलेश बनसोडकर, नरेंद्र शर्मा, गजानन भुसारी, विक्रांत सराफ,अरुण देशपांडे, रुपराव सावळे,मनोज चौहान, संजय केने, कैलास पवार, सुनील जाधव, संजय पाठक,अभिजित शेळके, संजय कुलकर्णी, सुधाकर मानवतकर, परमेश्वर शिंदे यांनी परिश्रम घेतले.

बातम्या आणखी आहेत...