आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानगर पंचायत क्षेत्रातील घरकुलाचे काम निधीअभावी रखडले होते. गटनेते रामराव पाटील नरवाडे यांनी निधीसाठी पाठपुरावा करीत दिलेल्या निवेदनाची दखल घेत शासना ने नगर पंचायतच्या खात्यात ७ कोटी ८० लाख रूपये जमा केल्याची माहिती नगराध्यक्षा करूणा शिरबिरे यांनी दिली. या निधीतून रखडलेल्या घरकुलांची कामे पूर्ण होणार आहेत.महागाव नगर पंचायत अंतर्गत पंतप्रधान आवास योजनेमध्ये प्रथम डीपीआरमध्ये २७५, व्दितीय डीपीआर मध्ये ४०१, असे एकुण ६७६ घरकुल मंजुर झाले आहे. असे असतांना प्रथम डीपीआर मधील २७५ लाभार्थींना राज्य शासनाकडून एक कोटी १० लाख रुपये, केंद्र शासनाकडून एक कोटी ६४ लाख ४० हजार रूपये, असा निधी मंजुर झाला होता. तो संपूर्ण निधी घरकुल लाभार्थींना देण्यात येऊन खर्च झाला तरीही यामधील राज्य शासनाचा एक कोटी ६५ लाख रूपये, केंद्र शासनाचा २ कोटी ४८ लाख १० रुपये, असा एकुण ४ कोटी १२ लाख रुपये निधी अद्याप प्राप्त झालाच नाही.
तसेच व्दितीय डीपीआरमध्ये ४०१ लाभार्थींना घरकुल मंजुर झाले असून, त्या करीता राज्य शासनाचा ४ कोटी एक लाख रुपये, केंद्र शासनाचा ६ कोटी एक लाख ५० हजार रूपये, असा एकुण १० कोटी २ लाख ५० हजार रुपये निधी मंजुर झाला, परंतु तो भेटला नसल्याने शहरातील घरकुल लाभार्थींच्या घराचे बांधकाम रखडले होते. हे घरकुलाचे काम पूर्ण होण्यासाठी निधी तात्काळ उपलब्ध करून देण्यात यावा, यासाठी महागाव नगर पंचायतीचे गटनेते रामराव पाटील यांच्या नेतृत्वात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री संजय राठोड, नगर पंचायत प्रशासनाने मुख्य अभियंता, राज्यस्तरीय समन्वय अधिकारी, प्रधानमंत्री आवास योजना, महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण मुंबई यांच्याकडे पत्रव्यवहार करण्यात आला होता. रामराव पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश येवुन शासनाच्या वतीने ७ कोटी ८० लाख रुपये नगर पंचायतच्या खात्यात जमा झाले. ते लवकरच लाभार्थींच्या खात्यात वर्ग केले जावुन या लाभार्थींचे घरकुलाचे काम पुर्ण होवुन त्यांचे स्वप्न साकार होणार आहे.
लाभार्थींचे घराचे स्वप्न लवकरच पूर्ण होईल घरकुल लाभार्थींच्या रखडलेल्या कामासाठी निधी उपलब्ध व्हावा म्हणुन सत्ताधारी गटाच्या सर्व पदाधिकारी, नगरसेवकांनी शासनाकडे मागणी केली होती. त्याची दखल घेवुन शासनाने जो निधी उपलब्ध करून दिला, त्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री संजय राठोड यांचे आभार मानतो. निधी उपलब्ध झाल्याने लाभार्थींच्या हक्काचे घर लवकरच पूर्ण होईल. - रामराव पाटील नरवाडे, गटनेता, महागाव.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.