आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयोजन:स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त दुसरबीड येथे 75 जणांचे रक्तदान

दुसरबीड3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील नारायणराव नागरे महाविद्यालयाच्या वतीने सतत कृतीशील उपक्रम राबवण्यात येतात. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा निमित्त ७५ रक्तदात्या विद्यार्थ्यांनी रक्तदान करून एक अभिनव उपक्रम राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून राबवला.यामध्ये प्राचार्य डॉ.विजय नागरे यांच्यासह प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी सुद्धा सहभाग नोंदवला होता.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचे औचित्य साधून प्राचार्य तथा राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ.विजय नागरे यांच्या विशेष मार्गदर्शनात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात प्रामुख्याने प्रभात फेरी आयोजित करून विविध पथनाट्य मतदार जनजागृती, एड्स जनजागृती, संविधान जनजागृती, साक्षरता अभियान, झाडे लावा, झाडे जगवा अभियान, बेटी बचाव, बेटी पढाव, अशा विविध विषयांवर प्रभात फेरीच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. तसेच गावात स्वच्छता, वृक्षदिंडी काढण्यात आली. यामध्ये विद्यार्थ्यांनी हिरीरीने सहभागी झाले होते. स्वातंत्र्यदिनानिमित्त महाविद्यालयाच्या वतीने माजी सैनिक सुभेदार शेख साजिद यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर पदवी प्रदान कार्यक्रम पार पडला. ज्या विद्यार्थ्यांनी पदवी प्रदान केली आहे त्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.विजय नागरे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून शिल्पा कायंदे, धनश्री कायंदे, शिवराज कायंदे, सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी रमेशराव कायंदे, निवृत्ती वायाळ, प्रदीप जायभाये, सरपंच ज्योती सांगळे, प्रकाश सांगळे, हाजी शेख सत्तार, अशोक गुंजाळ, शेख अन्सार, सचिन मखमले, नारायण सांगळे, हाशम कुरेशी, पांडुरंग आप्पा देशमुख, कचरू भारस्कर, प्रा.दिलीप देशमाने, प्रा.डॉ.गणेश घुगे, प्रा.मधुकर काळुसे, प्रा. पंडीत सानप, प्रा.दिलीप चव्हाण, शेख युनूस, गजानन मुंढे, अनिल गायकवाड, अनिल रनमळे यांच्यासह शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...