आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मतदान:संग्रामपूर तालुक्यात  21 ग्रामपंचायतीसाठी 76.4 टक्के मतदान

संग्रामपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील २१ ग्रामपंचायतीचा कार्यकाळ संपल्याने आज १८ डिसेंबर या ग्रामपंचायतीची निवडणुक प्रक्रिया शांततेत पार पडली. यावेळी २१ सरपंचासह १७३ सदस्याचे भाग्य मशिन बंद झाले आहे.

२१ ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच पदासाठी ५९ उमेदवार तर १७३ सदस्य पदासाठी २२३ उमेदवार निवडणूक रिंगणात उभे ठाकले होते. यावेळी २८ हजार १३३ पुरुष व २१ हजार ४८९ महिलांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे. तर तालुक्यात सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या पातुर्डा ग्रामपंचायत मध्ये ७३४३ मतदार पैकी ४८५३ मतदारांनी मतदान केले असून त्याची टक्केवारी ६६. ९ आहे. २१ ग्रामपंचायत मतदानाची टक्केवारी ७६.४ आहे. मतदान प्रक्रियेनंतर उपरोक्त सरपंच व सदस्यांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे.

बातम्या आणखी आहेत...