आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रा. पं. निवडणूक:जिल्ह्यात 80.47 टक्के मतदारांनी बजावला हक्क; मतदान शांततेत

बुलडाणाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील २६१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी आज, दि. १८ डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. जिल्हाभरात साडेपाच वाजेपर्यंत तीन लाख ३ हजार ४९० मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. त्यानुसार एकूण ८०.४७ टक्के मतदान झाले.

जिल्ह्यातील कार्यकाळ संपलेल्या २७९ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक जाहीर झाली होती. मात्र, उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत सरपंचपदाचे २१, तर ग्रामपंचायत सदस्यपदाच्या ७३५ उमेदवारांची बिनविरोध करण्यात आली. त्यामुळे उर्वरित जागांसाठी आज मतदान प्रक्रिया राबवण्यात आली. सरपंचपदाच्या २५१ जागांसाठी, तर सदस्यपदाच्या एक हजार ५४७ जागांसाठी मतदान पार पडले. िजल्ह्यातील २६१ ग्रामपंचायतींसाठी ८४२ मतदान केंद्रांवर सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरू होती. मतदान प्रक्रिया अंितम टप्प्यात असताना अनेक केंद्रांवर मतदारांची गर्दी वाढली. एकूण चार लाख तीन हजार ८९९ मतदारांपैकी दुपारी साडेतीन वाजेपर्यंत दोन लाख ५६ हजार ७९० मतदारांनी हक्क बजावला.

बुलडाण्यातील सुंदरखेडमध्ये किरकोळ वाद
बुलडाणा शहरालगतच्या सुंदरखेड ग्रामपंचायतीसाठी असलेल्या ज्ञानदीप शाळेतील मतदान केंद्रावर सकाळी किरकोळ बाचाबाची झाली. मतदान केंद्राच्या हद्दीत एका उमेदवाराकडून मतदारांना चिठ्ठ्या देण्यासाठी मंडप उभारला होता. त्यावर काही उमेदवारांनी आक्षेप घेत आरडाओरड केली. याची माहिती मिळताच पोलिसांनी मंडप हटवण्याच्या सूचना दिल्या.

जिल्ह्यात एका तृतीयपंथीयाचे मतदान
जिल्ह्यात दोन तृतीयपंथीयांपैकी एकाने मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये संग्रामपूर तालुक्यात एकानेच मतदान केले.

बातम्या आणखी आहेत...