आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:आरोग्य शिबिराचा 81 कामगारांनी घेतला लाभ ; मासरुळ जि. प. सर्कलमधील बांधकाम कामगारांसाठी अभिनव उपक्रम

चिखली23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मासरुळ जिल्हा परिषद सर्कल मधील सर्व बांधकाम कामगारांच्या आरोग्य तपासणीला जामठी येथून प्रारंभ करण्यात आला आहे. यामाध्यमातून आरोग्य तपासणी शिबिराचा ८१ कामगारांनी लाभ घेतला. मासरूळ जिल्हा परिषद सर्कल मध्ये हा अभिनव उपक्रम राबवू, सर्व बांधकाम कामगारांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन मनोज दांडगे यांनी केले आहे.

जामठी येथे माजी मंत्री आमदार डॉ.राजेंद्र शिंगणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नाझेर काझी, पक्ष निरीक्षक रवींद्र तौर तसेच राष्ट्रवादी काँग्रेस कामगार सेलचे प्रदेशाध्यक्ष शिवाजीराव खटकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष मनोज दांडगे यांच्या वतीने ८ सप्टेंबर रोजी बांधकाम कामगारांच्या आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जाकीर सेठ होते. बांधकाम कामगारांचे आरोग्य सुरक्षित असावे, या उद्देशाने आरोग्य तपासणी मोहिमेचा प्रारंभ जामठी येथून करण्यात आला.

आरोग्य तपासणी शिबिरात ८१ कामगारांनी लाभ घेतला. यावेळी मनोहर तायडे,जाकीर शेख यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, मनोज दांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली कामगारांसाठी सदैव कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले. सर्व गावांमध्ये मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन ही लवकरच करणार असल्याचे त्यांनी सांगितले. सूत्रसंचालन गणेश तायडे यांनी केले. यावेळी सरपंच बिलाल गायकवाड, कौतिकराव नरोटे, जाकीर शेख, रामेश्वर तायडे, भगवान तायडे, रामदास तायडे, शेषराव तायडे, गजानन तायडे, शालिकराम तायडे, सलीम खासाब, अमीन खासाब, नामदेव म्हस्के, समाधान तायडे, सुनील तायडे, पांडुरंग रावळकर, संजय तायडे, दिलीप तायडे, रमेश तायडे, मनोहर तायडे, अजय तायडे, प्रकाश तायडे, विलास तायडे, नारायण गायकवाड, अंबादास म्हस्के, शुभम तायडे, सुभाष तायडे, तेजराव रावळकर, भगवान धांदे, विशाल तायडे, राजेश तायडे, गजेबा रावळकर, रमेश राऊत, राहुल तायडे, संदीप तायडे, गजानन माळोदे, गणेश पवार, रामभाऊ तायडे, कृष्णा खरात, संदीप तायडे, विष्णु तायडे जामठी येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते व गावकरी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...