आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मतदान:शेगाव तालुक्यात 84.65 टक्के मतदान

शेगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील दहा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी आज १८ डिसेंबर रोजी मतदान घेण्यात आले. दुपारी साडे पाच वाजेपर्यंत ३२ मतदान केंद्रावर ८४.६५ मतदान झाले. त्यामुळे दहा सरपंचासह पंचेचाळीस सदस्याचे भाग्य मशीन बंद झाले आहे. येत्या मंगळवारी निकाल जाहिर करण्यात येणार आहे. तोपर्यंत मतदारासह उमेदवारांना निकालाची वाट पाहावी लागणार आहे.

कार्यकाळ संपल्याने तालुक्यातील दहा ग्रामपंचायतीचा निवडणुक कार्यक्रम घोषीत करण्यात आला होता. या निवडणुकीत आपले नशिब अजमाविण्यिासाठी सरपंच पदासाठी दहा तर सदस्य पदासाठी पंचेचाळीस उमेदवार निवडणुक रिंगणात उभे ठाकले होते. दरम्यान आज दहा ग्रामपंचायतीच्या सरपंच व सदस्य पदासाठी मतदान घेण्यात आले. सायंकाळी साडे पाच वाजेपर्यंत तालुक्यात ८४.६५ टक्के मतदान झाले असून ७ हजार ९९० मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे. त्यामध्ये ३६७६ महिला व ४३१४ पुरुष मतदारांचा समावेश आहे.

ग्रामपंचायतनिहाय झालेले मतदान कठोरा ९१.५७ चिंचखेड ७९.९१सगोडा ८०.३५ खातखेड ८७.११ माटरगाव खुर्द ७९.९१, कुरखेड ८२.१७, तिव्हान ८५.७४ येउलखेड ८७. ३९, पाळोदी ८९.३९ व लासुरा येथे ८३.४७ टक्के मतदान झाले आहे. मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी तहसीलदार तथा निवडणुक अधिकारी समाधान सोनवणे यांच्यासह महसूल कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. मतदानाचा निकाल मंगळवारी जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे दोन दिवस कोण बाजी मारणार व कोण हरणार याची चर्चा ग्रामीण भागात रंगणार आहे.

बातम्या आणखी आहेत...