आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील भरोसा येथील एका २३ वर्षीय विवाहितेने शौचास जात असल्याचे सांगून विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना ६ ऑगस्टला सकाळी घडली. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली आहे. स्वाती परमेश्वर थुट्टे असे आत्महत्या करणाऱ्या विवाहितेचे नाव आहे. विवाहितेने आत्महत्या का केली, याचे कारण अद्याप समजू शकले नाही.
जाफ्राबाद तालुक्यातील सोनगिरी माहेर असलेल्या स्वातीचे तीन वर्षांपूर्वी लग्न झाले होते. तिला एक वर्षाची मुलगी आहे. दरम्यान ६ ऑगस्टला सकाळी शौचास जात असल्याचे सांगून ती घरातून बाहेर पडली. परंतु बराच वेळ होऊनही ती घरी परत न आल्याने नातेवाइकांनी तिचा शोध सुरू केला. त्यावेळी गावाशेजारी गट क्रमांक २६ मधील दुर्गादास लक्ष्मण शिवरकर यांच्या विहिरीच्या काठावर तिच्या चपला दिसून आल्या. त्यामुळे नातेवाइकांसह ग्रामस्थांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. यावेळी ग्रामस्थांनी गळ टाकून तिचा विहिरीत शोध घेतला असता गळात अडकून तिचा मृतदेह बाहेर आला. माहिती मिळताच अंढेरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी हलवला. विवाहिता स्वातीने आत्महत्या का केली याचे कारण समजू शकले नाही.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.