आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा येथे उभ्या १०५ फूट उंचीच्या श्री हनुमान मूर्ती देवस्थानात हनुमान जन्मोत्सवाची जय्यत तयारी सुरू असून साडेतीन क्विंटल फुलांचा हार रिमोटने मूर्तीला चढवण्याचा सोहळा पाहण्यासाठी भाविकांची प्रचंड गर्दी होते. राज्यभरातून हा जन्मोत्सव पाहण्यासाठी भाविक येथे येतात. येथील या भव्य हनुमान मूर्तीमुळे गावाची वेगळी ओळख निर्माण झाली असून २००१ पासून नांदुरा शहराला “हनुमाननगरी” अशी ओळख मिळाली आहे.
तरुणाईसाठी बजरंग हेच खरे दैवत
}मोहनबुवा रामदासी कार्यकारी विश्वस्त, आनंदी-नारायण कृपा न्यास श्रीक्षेत्र खातगाव, ता. कर्जत
मन, मनगट व मेंदू बळकट करून कुठल्याही क्षेत्रात यश संपादन करायचे असेल तर शक्तिरूपात श्री मारुतीराय आदर्श ठरतात.
विद्यावान गुनी अति चातुर । राम काज करिबे को आतुर ॥ प्रभु चरित्र सुनिबे को रसिया । राम लखन सीता मन बसिया ॥ अत्यंत बुद्धिमान, गुणी, चातुर्य असणारे श्री हनुमंत म्हणजे शक्ती- बुद्धीचा संगम. श्रीरामांचे चरित्र ऐकण्यासाठी जे आतुर असतात, श्रीराम, माता सीता व लक्ष्मण ज्यांच्या हृदयात वास करतात असे हे हनुमान!
और देवता चित न धरई । हनुमत सेइ सर्व सुख करई ॥ संकट कटै मिटै सब पीरा । जो सुमिरै हनुमत बलबीरा ॥ अशा प्रकारे हनुमंतरायाने आपल्या जीवनात येणाऱ्या आकस्मिक संकटांचा नाश करावा व आपल्याला नेहमी सुख प्रदान करावे... हनुमान जन्मोत्सवानिमित्त खूप शुभेच्छा.
हनुमान जन्मोत्सवाला गजकेसरी व लक्ष्मीनारायण योग
}पंडित वेणुगोपाल जिल्हा, सोलापूर
बऱ्याच वर्षांनंतर चैत्र शुक्ल पौर्णिमेदिवशी चंद्र व गुरू ग्रह एकत्र आले आहेत. पौर्णिमा व हनुमान जन्मोत्सव एकत्र आल्याने गुरुवारचा सोहळा धार्मिक योगांनी भरलेला आहे. चंद्र आणि गुरूच्या एकत्र येण्याच्या या योगाला “गजकेसरी योग’ म्हणतात. यामुळे या दिवशी श्री हनुमानाची केलेली सेवा थेट शनिदेवाला पोहोचते, अशी भावना आहे.
ग्रह गोचरात, मकर, कुंभ, मीन, कर्क आणि वृश्चिक या राशींवर शनीचा प्रभाव असून त्याच्या शुभ फळासाठी श्री हनुमान जन्मोत्सवदिनी हनुमान आराधना करावी. ही पौर्णिमा गुरुवारी सकाळी १०.०५ वाजता समाप्त होणार आहे.
{गुरुवारी सूर्योदयावेळी सकाळी ६ वाजता जन्मोत्सव साजरा करावा.
{श्रीराम चरित्रमानस, सुंदरकांड पाठ, हनुमान चालिसा, हनुमान वडवालन स्तोत्र याचे वाचन करावे.
{हा लक्ष्मीनारायण योग आहे. या दिवशी घरीच कुंकुमअर्चना किंवा विष्णूच्या मंदिरात जाऊन दर्शन घेणे अधिक फलदायी ठरेल.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.