आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रथमोपचार:वडिलांचे पार्थिव घेऊन जाणाऱ्या मुलाच्या कारला अपघात; 4 जखमी

डोणगाव3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वडिलांचे पार्थिव रुग्णवाहिकेद्वारे बिहारमधील मूळगावी बक्सर येथे घेऊन जाणाऱ्या मुलाच्या कारला डोणगाव नजीक अपघात झाला. या अपघातात कारमधील चार जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना शुक्रवारी सकाळी अकराच्या सुमारास घडली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या चारही जणांवर खासगी रुग्णालयात प्रथमोपचार करून त्यांना तातडीने जालना येथे हलवण्यात आले आहे. जखमींमध्ये राम वर्मा, गायत्रीदेवी वर्मा, अमितादेवी वर्मा, अनितादेवी वर्मा यांचा समावेश आहे.

राम वर्मा हे पुणे येथील एका कंपनीत कामाला आहेत. त्यांच्या वडिलांचे निधन झाल्याने त्यांचे पार्थिव एका रुग्णवाहिकेद्वारे घेऊन ते बिहार राज्यातील बक्सर येथे गावी जात होते. पार्थिव ठेवलेली रुग्णवाहिका समोर व पाठिमागे कारद्वारे वर्मा कुटूंब जात होते. बुलडाणा व वाशीम जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात असलेल्या व डोणगाव लगतच असलेल्या पिंप्री सरहद गावाजवळ एमएच ४६/बीएम/ ६५७५ या क्रमांकाच्या वाहनाची व वर्मा यांच्या एमएच१२/ एमबी/ ३८२२ या क्रमांकाच्या कारची समोरासमोर धडक झाली. या अपघातात चार जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना येथील खासगी दवाखान्यात भरती करण्यात आले होते. नंतर त्यांना जालना येथे हलवण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...