आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस कारवाई:नकली सोन्याच्या गिन्न्या देवून बस चालकाची नऊ लाखाने फसवणूक

खामगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नकली सोन्याच्या गिन्या देवून मुंबई येथील एका बस चालकाची नऊ लाखाने फसवणूक झाल्याची घटना आज बुधवारी उघडकीस आली आहे. वृत्त लिहिपर्यंत पोलिसांची कारवाई सूरू होती.मुंबई येथील बस चालक संदेश गोविंद उनवरकर वय ३६ यांची मुंबईत एका व्यक्तीशी ओळख झाली. दोघांमध्ये नेहमी मोबाइलवर बोलणे सुरू होते. दरम्यान, त्या व्यक्तीने उनवरकर यांना कमी पैशात सोन्याच्या गिन्या देण्याची आमिष दिले. या आमिषाला बळी पडून संदेश उनवरकर हे आपल्या एका मित्राला घेवून खामगावात आले. ठरल्याप्रमाणे ते नऊ लाख रुपये घेवून जळका तेली शिवारातील एका शेतात गेले. काही वेळानंतर आलेल्या तीन जणांनी नकली गिन्या देवून त्यांच्याकडील नऊ लाख रुपये घेवुन त्यांना शेतातच बांधुन ठेवत तेथून निघून गेले. काही वेळानंतर उनवरकर यांनी मित्राच्या मदतीने सुटका करून घेत ते मुंबईला निघून गेले. त्यांनी आज फसवणूक प्रकरणी ग्रामीण पोलिसांत तक्रार दाखल केली. वृत्त लिहिपर्यत पोलिसांची कारवाई सुरू होती.

बातम्या आणखी आहेत...