आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:मालवाहू पिकअपची दुचाकीला‎ धडक; एक जागीच ठार, दुसरा गंभीर‎

जळगाव जामाेद10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भरधाव जाणाऱ्या मालवाहू‎ पिकअपने समोरून येत‎ असलेल्या दुचाकीस जबर‎ धडक दिली. या अपघातात‎ दुचाकीवरील एक जण जागीच‎ ठार झाला असून दुसरा गंभीर‎ जखमी झाला आहे. ही घटना‎ आज १२ मार्च रोजी दुपारी साडे‎ चार वाजेच्या सुमारास‎ जामोद-टुणकी रस्त्यावरील‎ हस्तीमल चांडक यांच्या‎ शेताजवळ घडली.‎ जामोदवरुन एम.एच. ०१ एल.‎ ए/ १९७४ या क्रमांकाचा‎ मालवाहू पिकअप टुणकीच्या‎ दिशेने जात होता. तर एम.एच.‎ २८ / ए डब्ल्यु/ ३७१२ या‎ क्रमांकाची दुचाकी जामोद कडे‎ येत होती. चांडक यांच्या‎ शेताजवळ येताच मालवाहू‎ पिकअपने समोरुन येत‎ असलेल्या दुचाकीस जबर‎ धडक दिली.

या अपघातात‎ डोक्याला जबर मार लागल्याने‎ जसन धरमसिंग जामरा वय ३०‎ रा. डुक्करदरी या युवकाचा‎ जागीच मृत्यू झाला आहे. तर‎ डिचऱ्या तुमल्या राऊत वय ३२‎ हा युवक गंभीर जखमी झाला‎ आहे. अपघात घडताच भरधाव‎ मालवाहू पिकअप दोन वेळा‎ पलटी होवून रस्त्याच्या बाजूने‎ जात असलेल्या गाईला धडकले.‎ या अपघातात शिंगांचे दोन तुकडे‎ होवून गाय गंभीर जखमी झाली.‎ अपघात घडताच पिकअप‎ चालकाने घटनास्थळावरुन‎ पलायन केले. अपघात घडताच‎ ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव‎ घेवून जखमींना येथील ग्रामीण‎ रुग्णालयात उपचारार्थ दाखल‎ केले. वृत्त लिहिपर्यत पोलिसांची‎ कारवाई सुरू होती.‎

बातम्या आणखी आहेत...