आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात तोडफोड करणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल

बुलडाणा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात वाहनांच्या नोंदणीसाठी आलेल्या एकाने वाद घालत कार्यालयातील साहित्याची तोडफोड केली. या प्रकरणी दाखल तक्रारीवरून शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी संजय हाडे याने नवीन चारचाकी वाहनाच्या नोंदणीसाठी तात्पुरत्या नोंदणी प्रमाणपत्राची कागदपत्रे दिली. ऑनलाइन संगणकीय प्रणालीवर नोंद घेण्यास सांगितले. परंतु सीएनजी किटची माहितीची नोंद संगणकीय प्रणालीवर नसल्याने ते काम होऊ शकत नाही, असे वरिष्ठ लिपिक राजेश राठोड यांनी समजावून सांगितल्यावर संजय हाडे याने दबाव आणण्याचा प्रयत्न करत शिवीगाळ करुन शासकीय कामात अडथळा निर्माण केला. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात आरोपी संजय हाडे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास ठाणेदार प्रल्हाद काटकर यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलिस निरीक्षक जयसिंह पाटील हे करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...