आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मलकापूरच्या लोमटे महाराजांवर विनयभंगाचा गुन्हा:महिलेकडे शरीरसुखाची मागणी, व्हिडीओ व्हायरल करण्याचीही धमकी

उस्मानाबाद6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मलकापूर येथील एकनाथ सुभाष लोमटे महाराज यांच्यावर येरमाळा पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बीड येथील दर्शनासाठी आलेल्या एका महिलेला त्यांनी बळजबरी करत शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी केली. तसेच विरोध केल्यास अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकीही यावेळी दिली. याप्रकरणी येरमाळा पोलीस ठाण्यात गुरुवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास उपनिरीक्षक जी. पी. पुजरवाड करत आहेत.

या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक महिला 28 जुलैला दुपारच्या सुमारास परळी (बीड) येथुन बसने एकनाथ सुभाष लोमटे महाराजांच्या दर्शनासाठी आली होती. मलकापुर येथील त्यांच्या मठात महिला आली. त्यावेळी तेथे भक्तांच्या जेवणाचा कार्यक्रम सुरु असल्यामुळे महिला मठाच्या ईमारतीच्या बाहेर असलेल्या पिंपळाच्या झाडाखाली थांबली होती. दुपारी 2:30 च्या सुमारास एकनाथ महाराज यांचा शिष्य अशोक याने मठाच्या बाजुला असलेल्या रुम जवळ त्यांना बोलावुन घेत समोरच्या रूममध्ये एकनाथ महाराज बसलेले असून त्यांनी तुम्हाला आतमध्ये बोलावले असल्याचा निरोप दिला.

व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी

पिडीत महिला रूममध्ये गेल्यानंतर आतमध्ये एकनाथ महाराज एकटे बसले होते. यावेळी एकनाथ महाराज यांनी महिलेला माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवावे लागतील, अशी थेट धमकी दिली. तसेच गेल्या वेळी आली होतीस, तेव्हा मी तुला पेढा खाण्यासाठी दिल्यानंतर तु झोपली होतीस. त्यावेळी तुझ्यावर बलात्कार केला असून त्याचे चित्रीकरण केल्याचे त्यांनी सांगितले. तो व्हिडीओ माझ्याकडे आहे. मी तो व्हायरल करेल अशी धमकी त्यांनी दिली.

महिलेला मारहाण

यावेळी महाराजांनी महिलेवर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. महिलेने आरडाओरडा केल्यानंतर एकनाथ महाराज यांनी महिलेला मारहाण केली. त्यावेळी महाराजांच्या शिष्याने बाहेरून दरवाजा उघडला. तेथे महाराजांचे बरेच भक्त जमा झाले होते. एकनाथ महाराज यांनी आपल्याला शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली आहे, असेही महिलेने फिर्यादीत म्हटले आहे.

महाराजांचे शिष्य महाराष्ट्रभर

मलकापूर येथील एकनाथ लोमटे महाराज यांना मानणारा भक्त वर्ग मोठा आहे. दर महिन्याला मलकापूर मठात भाविकांचा मोठा मेळावा आयोजित केला जातो. लोमटे महाराजांवर यापूर्वीही अनेक आरोप झालेले आहेत. ते अंधश्रद्धा पसरवीत असल्याचा आरोपही त्यांच्यावर केला जातो.

बातम्या आणखी आहेत...