आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मारहाण:दोन सख्ख्या भावांमध्ये वाद; गुन्हा दाखल

बुलडाणा23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

धाकट्याने मोठ्या भावास काहीही कारण नसताना दारू पिऊन शिविगाळ केली. त्यातून दोन भावांमध्ये वाद झाला. प्रकरणी दिलेल्या तक्रारीवरून ग्रामीण पोलिसांनी ५ नोव्हेंबर रोजी लहान भावा विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. नांद्राकोळी येथील दिनेश थेरोकार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांना दोन भाऊ असून, त्यांच्यापेक्षा लहान असलेला गणेश थेरोकार याला दारू पिण्याचे व्यसन असून तो किरकोळ कारणावरून वाद घालतो.

३ नोव्हेंबर रोजी आईला भेटण्यासाठी गेलो असता, त्या ठिकाणी लहान भाऊ गणेश याने येवून काहीही कारण नसताना अश्लील शिविगाळ करुन मारहाण केली. या तक्रारीवरून ग्रामीण पोलिसांनी गणेश थेरोकार याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

बातम्या आणखी आहेत...