आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विषारी कीटकनाशक घेऊन आपली जीवनयात्रा संपवली:देऊळगाव धनगर येथील शेतकऱ्याची कर्जापायी आत्महत्या

चिखली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील देऊळगाव धनगर येथील अल्प भूधारक ६२ वर्षीय शेतकऱ्याने सततची नापिकी आणि बँकेच्या कर्जाला कंटाळून विषारी कीटकनाशक घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.शेषराव येडुजी घुबे वय ६२ असे या शेतकऱ्यांकडे नाव असून, देऊळगाव धनगर शिवारात त्यांची ५ एकर कोरडवाहू शेती आहे.

त्यांनी २०१६ मध्ये सेंट्रल बँक गांगलगाव यांच्याकडून एक लाख १५ हजार रुपये कर्ज घेतले होते. मात्र निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतीतून उत्पादन खर्च सुद्धा निघाला नसल्याने बँकेचे कर्ज फेडू शकले नाही. या वर्षी सुद्धा देऊळगाव धनगर परिसरात अतिवृष्टी झाल्याने आणि सतत कोसळणाऱ्या पावसामुळे यावर्षी सुद्धा हातचे पीक जाते की काय या भितीने ते हादरून गेले होते. त्यातच शेतात कोणीच नसल्याचे पाहुन त्यांनी ४ ऑगस्ट रोजी विषारी औषध घेतले.

बातम्या आणखी आहेत...