आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासततच्या पावसाने सोयाबीन पिकाची वाढ खुंटली व सोयाबीन पीक सोंगणीला आले असता अति पावसामुळे खराब झाले. यामुळे सोयाबीनच्या उत्पन्नात घट झाली. त्यात उसनवार घेतलेल्या कर्जाची परतफेड कशी करावी या नैराश्यपोटी शेतकऱ्याने विष प्राशन करुन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी रात्री उघडकीस आली. तालुक्यातील कोद्री येथील साठ वर्षीय शेतकरी श्यामराव रामभाऊ वानखडे यांच्या नावे कोद्री शिवारात २ एकर शेत जमीन असून यंदा त्यांनी सोयाबीन पेरणी केली होती.
परंतु सततच्या पावसाने शेतामध्ये तण वाढल्याने सोयाबीन पिकाची वाढ खुंटली व सोयाबीन पीक सोंगणीला आले असता पावसामुळे खराब झाले. यामुळे सोयाबीनच्या उत्पन्नात घट झाली. त्यात उसनवार घेतलेले कर्जाची परतफेड कशी करावी या नैराश्यपोटी शेतातच विषारी औषध प्रशासन केले. यानंतर ते घरी आल्यावर विषाची दुर्गंधी येत असल्याने वानखडे कुटुंबियांनी त्यांना त्यांना उपचारार्थ शेगाव येथील सईबाई रुग्णालयासाठी हलवले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मुत्यू झाला. मृत शेतकऱ्याच्या पश्चात पत्नी, २ मुले, १ मुलगी असा आप्त परिवार आहे.
एकाच कुटुंबातील दोन व्यक्तींचा मृत्यू
कोद्री गावातील वानखडे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. आबाराव वानखडे यांचा दुचाकीने एकलारा रोडवर झालेल्या अपघातात घटनास्थळी मुत्यू झाला. तर शेतकरी श्यामराव वानखडे यांनी विषप्राशन केल्याने त्यांचा मृत्यू झाला. एकाच दिवशी कोद्री येथील दोन वेगवेगळ्या घटनेत एकाच कुटुंबातील दोन व्यक्तींचा मृत्यू झाल्याने दोघांवर स्थानिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.