आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हत्या:दागिन्यांसाठी बाप-लेकाने केला महिलेचा खून ; पिशवीत भरुन दिला फेकून

मलकापूर24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोन्याच्या दागिन्यासाठी बाप-लेकाने एका महिलेची क्रूरपणे हत्या करून तिचा मृतदेह मुक्ताईनगर-बुऱ्हाणपूर मार्गावर एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये टाकून फेकून दिल्याची घटना २९ ऑगस्ट रोजी उघडकीस आली होती. हा मृतदेह शहरातील गणपती नगरात राहणाऱ्या पालिकेच्या सेवानिवृत्त महिला कर्मचारी श्रीमती प्रभा माधव फाळके यांचा असल्याचे उघड झाले होते. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. दरम्यान काल १ सप्टेंबर रोजी मुक्ताईनगर पोलिसांनी शहरात येवून विश्वास भास्कर गाढे वय ५० व भार्गव विश्वास गाढे वय २१ रा.गणपती नगर, मलकापूर या बाप लेकास अटक केली असून विश्वास गाढे याची प्रकृती बिघडल्याने त्यास शहरातील खासगी रुग्णालयात उपचारार्थ पोलिस संरक्षणात दाखल करण्यात आले आहे. तर मुलगा भार्गव गाढे यास मुक्ताईनगर पोलिस अटक करून घेऊन गेले.

शहरातील गणपती नगर भाग दोन मधील रहिवासी प्रभा माधव फाळके वय ६३ रा.गणपती नगर ही महिला २७ ऑगस्ट रोजी परिसरातच असलेल्या मंदिरात पूजेची थैली घेवून दर्शनासाठी जात असल्याचे मुलाला व सुनेला सांगीतले. २९ ऑगस्ट रोजी जळगाव खांदेश जिल्ह्यातील मुक्ताईनगर ते बर्हाणपुर महामार्गावरील कुंड गावाजवळ असणार्या पुलाच्या खालील बाजूस एका महिलेचा मृतदेह आढळून आला होता. याबाबत मुक्ताईनगर पोलिसांनी चौकशी केल्यानंतर त्या महिलेची ओळख पटली नव्हती. प्रकरणी पोलिसांनी पंचनामा करून अज्ञात आरोपीविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल केला होता. तत्पुर्वी प्रभा फाळके ह्या घरून निघून गेल्याची तक्रार त्यांचा मुलगा रितेश माधव फाळके याने शहर पोलीसात दिली होती. याबाबत शहर पोलिसांनी मुक्ताईनगर पोलिसांनी पाठविलेला फोटा त्या महिलेच्या मुलाला दाखविला असता ती आपली आई असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.

त्यानंतर मुक्ताईनगर पोलिसांशी संपर्क केल्यानंतर ही बाब उघडकीस आली. ३१ ऑगस्ट रोजी मुक्ताईनगर उपविभागीय पोलिस अधिकारी कुणाल सोनवणे, स्थानिक गुन्हे शाखेच पोलीस निरिक्षक किरणकुमार बकाले, मुक्ताईनगरचे ठाणेदार शंकर शेळके, ऐ.पी.आय शेवाळे, पो.कॉ. रवि धनगर, धर्मेंद्र ठाकुर, राहुल बेहरवाल, नितिन व्यवहारे हे शहरात दाखल होवून तपासचक्रे फिरवत फाळके यांच्या घराशेजारी राहणार्या विश्वास भास्कर गाढे वय ५० व भार्गव विश्वास गाढे वय २१ रा. गणपती नगर, या बापलेकास पोलिसांनी १ सप्टेंबर रोजी ताब्यात घेतले. प्रभा शेळके यांच्या अंगावरील सोन्याच्या दागिन्यांसाठी बाप लेकाने त्यांच्या राहत्या घरात प्रभा फाळके यांचा निर्घुण खुन करुन त्यांचा मृतदेह जाड प्लासीच्या कॅरीबॅगमध्ये भरुन दोघांनी दुचाकीवरून कुंड गावानजीक असलेल्या पुर्णा नदीच्या पुलाखाली फेकून दिला होता.

बातम्या आणखी आहेत...