आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हत्या:दगडाने ठेचून पन्नास वर्षीय महिलेची हत्या

धाड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मागील दहा वर्षांपासून सैलानी येथे वास्तव्यास असलेल्या पन्नास वर्षीय महिलेची हत्या झाल्याची घटना १४ डिसेंबर रोजी सायंकाळी उघडकीस आली. याप्रकरणी अज्ञात मारेकऱ्याविरोधात रायपूर पोलिस ठाण्यात रात्री उशिरा खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, विकास मुरलीधर कोतकर (२७) रा. सुलतानपूर, ता. खुलताबाद, जि. औरंगाबाद याने आपल्या तक्रारीत नमूद केले आहे की, आई लता मुरलीधर कोतकर हिस मागील दहा वर्षापासून पायाचा त्रास असल्याने ती सैलानी येथे नेहमी दर्शनाकरिता येत होती व तेथेच राहत होती. १४ डिसेंबरच्या रात्री ९ वाजेच्या सुमारास फिर्यादीची बहीण सपना दीपक खिल्लारे हिने फोन करून सांगितले की, ती आईला भेटण्यासाठी दोन दिवसांपूर्वी सैलानी येथे आली होती. परंतु तिची आईसोबत भेट झाली नाही. सपना ही सैलानी येथे हजर असताना तिला लोकांकडून समजले की, सैलानीला लागूनच असलेल्या भडगाव शिवाराच्या जंगलात तिच्या आईचे प्रेत पडलेले आहे. तिने तेथे जाऊन बघितले असता चेहरा व डोक्यावर दगडाने घाव केलेले होते. याप्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास ठाणेदार राजवंत आठवले हे करीत आहे.

बातम्या आणखी आहेत...