आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मतदान:येळगाव येथे मतदान केंद्राला लागून असलेल्या दुकानास आग

बुलडाणा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील २६१ ग्रामपंचायतीसाठी आज शांततेत मतदान झाले परंतु शहराच्या सीमेवर असलेल्या येळगाव येथे आज १८ डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास मतदान केंद्राला लागूनच असलेल्या एका दुकानाला भीषण आग लागली. काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केले होते. आग विझवण्यात यश आल्याने मतदान पुन्हा सुरळीत सुरू झाले. मात्र जवळपास अर्धा ते पाऊण तास गावात चांगलाच गोंधळ निर्माण झाला होता.

येळगाव येथील मराठी प्राथमिक शाळेत मतदान केंद्र ठेवण्यात आले होते. सकाळपासून शांततेत मतदान सुरु होते. परंतु सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास मतदान केंद्राच्या बाजुला असलेल्या विनायक देशमुख यांच्या दुकानाला अचानक आग लागली. आग भीषण रुप घेण्या आधीच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेवुन व पाण्याचा मारा करून आगीवर नियंत्रण मिळवले. अथक प्रयत्नाने आग विझली े. मतदान केंद्र परिसरात दुकाने बंद का केली गेली नाही, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. आचार संहितेचे पालन करतांना सकाळपासुन सुरु असलेले दुकान बंद का करण्यात आले नाही, याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. जर आगीने रौद्र रुप धारण केले असते तर मतदान केंद्रही कचाट्यात सापडले असते. तहसीलदार यावर कारवाई करतात, याकडे येळगाव वासियांचे लक्ष लागले आहे.

बातम्या आणखी आहेत...