आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आग:रेल्वे गेटजवळ कचऱ्याच्या ढिगाऱ्याला लागली आग; रेल्वे प्रशासनाचे झाले नुकसान

नांदुरा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रेल्वे गेटजवळ असलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्याला गुरुवारी दुपारच्या सुमारास आग लागली. या आगीत सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी रेल्वे प्रशासनाचे नुकसान झाले आहे.

नांदुरा शहरातून रेल्वे गेटमधून जळगाव जामोद रोडकडे जाण्याचा एकमेव मार्ग आहे. आग लागली त्यावेळी रेल्वे गेट बंद असल्यामुळे वाहनधारकांची चांगलीच तारांबळ उडाली होती. जवळपास असलेल्या दुकान मालकांनी तत्काळ दुकाने बंद केली. त्यामुळे वित्तहानी टळली. रेल्वे गेटजवळ जास्त प्रमाणात रहदारी असल्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. रेल्वे गेटजवळ नेहमीच घाणीचे व कचऱ्याचे साम्राज्य असल्यामुळे ही आग लागल्याचे समजते. ज्या वेळी आग लागली त्या वेळी कोणतीही गाडी रुळावर धावत नव्हती.

त्यामुळे मोठा अनर्थ टळला. ज्या ठिकाणी आग लागली तेथून थोड्याच अंतरावर रेल्वे रूळ, पेट्रोल पंप, मुंबई ते नागपूर राष्ट्रीय महामार्ग आहे. आगीचे रौद्ररूप पाहता पालिकेच्या अग्निशमन दलाची गाडी बोलावण्यात आली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. आगीत जीवितहानी झाली असती तर याला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे. या घटनेत नुकसान हे रेल्वे प्रशासनाची झाले आहे. आग कशामुळे लागली हे कळू शकले नाही.

बातम्या आणखी आहेत...