आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कबुली:सोळा घरफोड्या करणाऱ्या टोळीने दिली नऊ घरफोडी केल्याची कबुली

बुलडाणा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोळा घरफोड्या करणाऱ्या टोळीने नऊ घरफोड्या केल्याची कबुली दिली आहे. यावेळी आरोपीच्या ताब्यातून शहर पोलिसांनी सोन्याच्या दागिन्यांसह जवळपास ६ लाख ६७ हजार २६६ रुपयांचा माल जप्त केला आहे. आरोपींकडून अजूनही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता शहर पोलिसांनी व्यक्त केली आहे.

सय्यद शकील सय्यद युसूफ जोहर नगर, युनायटेड अर्बन पतसंस्थेचे अध्यक्ष अभय चोपडा, व्यवस्थापक गणेश सोनुने, एस. एस. सराफा दुकानदार परेश विसपुते, सय्यद आदिल सय्यद मुनाफ, रा. जोहर नगर, राजू बागवान रा. आरस लेआउट, शेख बबलू शेख निजाम सर्व रा. बुलडाणा अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

दरम्यान आज शुक्रवारी जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी शहर पोलिस ठाण्यात पत्रकार परिषद घेऊन या घरफोडीची माहिती दिली. यावेळी अपर पोलिस अधीक्षक बी.बी. महामुनी, उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन कदम, शहर ठाणेदार प्रल्हाद काटकर, पीएसआय नीलेश लोधी, अभिजीत अहिरराव उपस्थित होते. घटनेची माहिती देताना ठाणेदार काटकर म्हणाले की, या आरोपींनी आतापर्यंत सोळा घरफोड्या केल्या असून त्यापैकी नऊ घरफोडीची आरोपींनी कबुली दिली आहे.

आरोपी सय्यद शकील सय्यद इशू यांनी घरफोडी केल्याची कबुली दिली असून राजू बागवान शेख बबलू शेख निजाम याने सुद्धा घरफोडी केल्याचे सांगितले. तसेच घरफोडीतील सोने युनायटेड अर्बन पतसंस्थेचे अध्यक्ष, मॅनेजर व एस. एस. सराफ ज्वेलर्स असे मिळून ते मोडत होते. अशी कबुली आरोपींनी दिली आहे. या घरफोडी प्रकरणाची शहर पोलिसांनी कसून चौकशी केली असता, प्रथमदर्शनी आरोपींचा गुन्हा उघडकीस आला आहे. पुढील तपास शहर पोलिस करत आहेत.

जप्त करण्यात आलेला मुद्देमाल घरफोडी प्रकरणात एकूण नऊ घरफोडीचे व दोन दुचाकी चोराचे असे अकरा गुन्हे उघडकीस आले आहेत. ६ लाख ६० हजार रुपये किमतीचे १२ तोळे ३ ग्रॅम सोने, ७ हजार २६६ रुपये किमतीची ११३ ग्रॅम चांदी असा एकूण ६ लाख ६७ हजार २६६ रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...