आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समारोप:छत्रपती संभाजी राजेंच्या जयंतीनिमित्त बुलडाणा शहरामध्ये भव्य शोभायात्रा ; अभिवादन : विविध कार्यक्रमांच्या सादरीकरणाने जयंती उत्सवाचा समारोप

बुलडाणा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या दोन वर्षांपासून बंद असलेले उत्सव, शोभायात्रा सुरु झाल्या असून बुलडाण्यात ही छत्रपती संभाजी राजे जयंती उत्सव समितीने २३ वे वर्ष साजरे करत शहरातून पंचवीस वाहनांसह उज्जैन येथून आणलेला हत्तीने शोभा यात्रेची शोभा वाढवली आहे. गुजरात येथील कलाकारांचे आदिवासी नृत्यू, धर्मवीर आखाड्याचा मल्लखांब, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांची वेशभूषा, अफज़ल खानाचा वध, पावन खिंडची लढाई, सिंह गडावरील उदयभानासोबतची लढाई आदी कार्यक्रम या शोभायात्रेत कंटेनरवर सादर करण्यात आले. मराठी पाऊल पडती पुढेच्या कलाकारांनी यात सहभाग घेतला होता.

धर्मवीर आखाड्याच्या वतीने आ. संजय गायकवाड यांच्या नेतृत्वात छत्रपती संभाजी राजे जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष आशिष जाधव यांच्या अध्यक्षतेखाली गेले दोन दिवसांपासून संभाजीराजांचा जयंती उत्सव साजरा केला जात आहे. मराठी पाऊल पडते पुढे हा कार्यक्रम १३ मे रोजी सायंकाळी येथील गांधी भवनात पार पडला. शनिवारी सकाळी जन्मसोहळा सुवासिनींच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. सायंकाळी ५ वाजता संगम चौक शिवस्मारक येथून या शोभा यात्रेला सुरुवात झाली. यात छत्रपती शिवाजी महाराज बाळ शंभुराजे, सेवालाल महाराज, मल्हार मार्तंड, महाराणा प्रताप यांच्यासह १६ मावळ्यांसह वेशभूषा सादर करण्यात आल्या. रॅलीत तब्बल पंचवीस वाहनांचा समावेश होता. रथांमध्ये छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, भगवान श्रीराम, बजरंग बली, राजमाता जिजाऊंसह बाल शिवाजी आदींच्या मूर्ती ठेवण्यात आल्या होत्या. रॅलीत डफडे, डीजेसह भजनी मंडळांचाही सहभाग होता. शहरातील संगम चौक, जयस्तंभ चौक, कारंजा चौक, जनता चौक, कारंजा चौक आदी मार्गाने ही शोभायात्रा निघाली होती. कुणाल गायकवाड, भोजराज पाटील, संजय पाटील आदींनी शोभायात्रा यशस्वितेसाठी परिश्रम घेतले.

बातम्या आणखी आहेत...