आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षा‎:दारुच्या नशेत पत्नीचा खून करणाऱ्या‎ पतीस आजन्म कारावासाची शिक्षा‎

मेहकर‎21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

हुंड्यासाठी दारुच्या नशेत पत्नीच्या‎ अंगावर रॉकेल टाकून तिला पेटवून देत‎ तिचा खून करणाऱ्या पतीस येथील‎ न्यायालयाने आजन्म कारावास व दोन‎ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली‎ असून हा निकाल ४ नोव्हेंबर रोजी‎ देण्यात आला आहे.‎ लोणार तालुक्यातील कोयाळी‎ दहातोंडे येथील विठ्ठल भीमराव‎ दहातोंडे यांनी १६ जुलै २०१४ रोजी‎ मेहकर पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार‎ त्यांची बहीण सरला हिस तिचा पती‎ अनंता एकनाथ तांगडे वय ३६, सासु‎ पार्वती एकनाथ तांगडे वय ६५ व सासरे‎ एकनाथ महादू तांगडे वय ७२ सर्व‎ रा.पारडा ता. मेहकर यांनी माहेरवरून‎ पैसे आणण्याच्या कारणावरून बहिण‎ सरलाचा शारीरिक व मानसिक छळ‎ केला.

तर तिचा पती अनंता तांगडे याने‎ दारुच्या नशेत सरलाच्या अंगावर‎ रॉकेल टाकून तीला पेटवून दिले. या‎ तक्रारीवरून पोलिसांनी उपरोक्त‎ सासरच्या मंडळींविरुद्ध गुन्हा दाखल‎ केला होता. या प्रकरणाचा तपास सुरू‎ असतानाच सरला तांगडे या‎ विवाहितेचा उपचारा दरम्यान मृत्यू‎ झाला.

त्यामुळे पोलिसांनी खुनाचा गुन्हा‎ दाखल केला होता.‎ गुन्हयाचा तपास पोलिस उपनिरिक्षक‎ दिनेश एकनाथ चव्हाण व सहायक‎ पोलिस निरीक्षक विनायक कारेगावकर‎ यांनी करून आरोपी विरुध्द दोषारोप पत्र‎ न्यायालयात दाखल केले. दोन्ही पक्षाचा‎ युक्तीवाद ऐकून येथील न्यायालयाचे‎ न्यायाधीश एस.एम.चंदगडे यांनी‎ आरोपी विरुध्द दाखल पुरावे सबळ‎ असल्याने आरोपी पती अनंता एकनाथ‎ तांगडे यास आजन्म कारावास व दोन‎ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली‎ आहे. या प्रकरणी सरकार पक्षाच्या‎ वतीने ॲड जे. एम. बोदडे यांनी काम‎ पाहिले.‎

बातम्या आणखी आहेत...