आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील ढोरपगाव येथे मागील दोन दिवसांपासून बिबट्याचा मुक्तसंचार होत असून गावात दहशत पसरली आहे. गावशिवारात नेहमी दिसणारी माकडे सुध्दा बिबट्याच्या दहशतीने दिसेनाशी झाली आहेत, अशी माहिती ग्रामस्थांनी दिली तर गावातीलच कास्तकार शंकर दयाराम तांगडे यांनी गोठ्याबाहेर अंदाजे किंमत ५० हजार ची गाय ९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी दावणीला बांधली होती. १० नोव्हेंबर रोजी सकाळी ते शेतात गेले असता सदर गाय मृतावस्थेत आढळून आली.
हिंस्त्र प्राण्याने गायीचा फडशा पाडल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत होते. त्यामुळे शंकर तांगडे यांनी घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली असता बिबट्याच्या पंज्याचे ठसे त्यांना दिसून आले. याबाबतची माहिती त्यांनी वन विभागाला कळवली असता वन विभागात कार्यरत कांडेलकर व सुधाकर पवार हे घटनास्थळी पोहोचले होते व ठस्याचे छायाचित्र घेवून पंचनामा केला होता. बिबट्याने केलेल्या शिकारीमुळे गावकरी व जनावरांमध्ये सुध्दा दहशतीत आहेत. तरी वनविभागाने बिबट्याचा ताबडतोब बंदोबस्त न लावल्यास एखादा अनुचित प्रकार घडण्याची शक्यता आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.