आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कायम जमिनी भाडेपट्याबाबतचा प्रश्न:तहसील कार्यालयावर धडकला भूमिहीनांचा मोर्चा

चिखली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील शेकडो भुमीहीनांच्या बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित असलेल्या कायम जमिनी भाडेपट्याबाबतचा प्रश्न निकाली काढण्यात यावा, या मागणीसाठी तहसील कार्यालयावर समता संघटनेच्या वतीने भूमिहीनांचा मोर्चा काढण्यात आला.

या मोर्चाचे नेतृत्व समता संघटनेचे प्रदेशाध्यक्ष आम्रपाल वाघमारे यांनी केले होते. या मोर्चात तालुक्यातील शेकडो भू्मिहीन लाभार्थी व महिला सहभागी झाल्या होत्या. तहसिल कार्यालयावर येताच मोर्चाच्या शिष्टमंडळाने तहसीलदार यांना निवेदन दिले. त्यामध्ये शासनाकडे मागील अनेक वर्षांपासून गायरान व वनजमिनीचे कायम पट्टे मिळविण्यासाठी प्रयत्न केले आहेत. परंतु अद्याप पर्यंत शासनाने जाणीव पुर्वक भुमिहीनाकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे बऱ्याच वर्षांपासून कसत असलेल्या जमिनीचा भाडे पट्टा देवून नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे तत्काळ करण्यात यावे, यासह इतर मागण्या करण्यात आल्या आहेत. या मोर्चात संघटनेचे अध्यक्ष नितीन गवई शहर प्रमुख राहुल गवई, संदेश मोरे यांच्यासह शेकडो भू्मिहीन लाभार्थी सहभागी झाले होते.

बातम्या आणखी आहेत...