आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राहत्या घरी गळफास:सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

संग्रामपूर24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

हुंड्यासाठी शारीरिक मानसिक छळ व सासरच्या जाचाला कंटाळून एका पंचवीस वर्षीय विवाहितेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना ८ सप्टेंबर रोजी संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास तालुक्यातील वरवट बकाल येथे घडली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीस अटक केली आहे. तर सासू, सासरा व दीर हे तीन जण फरार झाले आहेत.

तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड येथील प्रल्हाद धुळे यांची मुलगी मीना हिचा विवाह तालुक्यातील वरवट बकाल येथील मंगेश किसन टाकळकर यांच्यासोबत रितीरिवाजा प्रमाणे झाला होता. लग्नानंतर काही काही दिवस सासर कडील मंडळीनी चांगली वागणूक दिली. मीनाला दीड वर्षाचा एक मुलगा आहे. त्यानंतर मात्र तुझ्या वडीलांनी लग्नात हुंडा कमी दिला म्हणुन सासरची मंडळी मीनाला शारीरिक व मानसिक त्रास देत होती. सासरचा त्रास असह्य झाल्याने मीना टाकळकर या विवाहितेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

या घटनेची माहिती तामगाव पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेवुन पंचनामा केला. श्वविच्छेदनानंतर मृतावर अंत्यसंस्कार करण्यासाठी माहेरची मंडळी वरवट बकाल येथे आली असता काळी काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी मीनाच्या माहेरकडील मंडळींनी आत्महत्येस प्रवृत केल्या प्रकरणी आरोपींना अटक करुन कारवाईची मागणी केली. त्यावर तामगाव पोलिसांनी नातेवाइकांना कारवाईचे आश्वासन दिले.

त्यानंतर पोलिस बंदोबस्तात मृत महिलेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. प्रकरणी मृत महिलेच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी पती मंगेश किसन टाकळकर, सासरा किसन टाकळकर, सासू सरुबाई टाकळकार, दीर संदीप टाकळकर यांच्या विरुध्द गुन्हा दाखल करून पती मंगेश किसन टाकळकर यास अटक केली आहे. तर सासू, सासरा व दीर हे तीन जण फरार झाले आहेत. पती मंगेश टाकळकर यास येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास प्रमोद उलेमाले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत विखे हे करित आहेत.

बातम्या आणखी आहेत...