आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवाहन:डोणगाव येथे पार पडली शांतता समितीची बैठक‎

डोणगाव8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील पोलीस ठाण्यात‎ २३ सप्टेंबर रोजी शांतता समितीची‎ बैठक घेण्यात आली. या वेळी ठाणेदार‎ नीलेश अपसूंदे व पोलीस उपनिरीक्षक‎ राहुल चव्हाण यांनी येणाऱ्या‎ नवरात्रोत्सव धम्मचक्र परिवर्तन दिन,‎ इद मिलादुनबी या सणाबाबत माहिती‎ देऊन येणारे सण हे शासनाच्या‎ नियमाचे पालन करुन सामाजिक‎ एकात्मता साधत व कायदा व‎ सुव्यवस्था अबाधित ठेऊन साजरे‎ करण्याचे आवाहन केले.

या वेळी‎ पोलीस पाटील यांनी डोणगाव‎ परिसरात वाढत्या चोऱ्यांबाबत माहिती‎ दिली. या वेळी ठाणेदार नीलेश अपसुंदे‎ यांनी गावात अज्ञात व्यक्ती फिरताना‎ आढळल्यास पोलिसांना माहिती द्यावी‎ असे आवाहन करण्यात आले आहे.‎