आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रुग्ण:एक महिन्यानंतर आढळला बुलडाणा शहरात कोरोनाबाधित रुग्ण

बुलडाणाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तब्बल एक महिन्यानंतर प्रयोगशाळेतील ३० अहवाल तपासणीत एक कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला आहे. यापैकी २९ अहवाल कोरोना निगेटिव्ह आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळा चाचणीमधील अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालांमध्ये प्रयोग शाळेतील १५ तर रॅपिड टेस्टमधील १४ अहवालांचा समावेश आहे. पॉझिटिव्ह आलेला अहवाल बुलडाणा शहरातील आहे.आजपर्यंत ८०९५२३ रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. आज रोजी ३२ नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण ९९०१०कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी ९८३२१कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सद्यस्थितीत कोविडचा उपचार घेत असलेला दोन रूग्ण आहे. तसेच आजपर्यंत ६८८ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला.

बातम्या आणखी आहेत...