आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्णय‎:फसवणूक प्रकरणी एकास‎ सश्रम कारावासाची शिक्षा‎

खामगाव‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

दुचाकी विकत घ्यायची आहे, असे‎ सांगून ती ट्रायलसाठी नेत परत न‎ करता फसवणूक करणाऱ्या एकास‎ एक वर्षाच्या सश्रम कारावासाची‎ शिक्षा सुनावण्यात आली. हा‎ निकाल न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग‎ कोर्ट क्रमांक एकच्या न्यायाधीश‎ श्रीमती एच. वाय. कवले यांनी ६‎ जानेवारी रोजी दिला.‎ फिर्यादी शिवाजी नारायण दैवे हे‎ एसटी चालक असून, त्यांनी १७‎ फेब्रुवारी २०२२ रोजी शहर पोलिस‎ ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार त्यांनी‎ मावसभावास त्यांची जुनी दुचाकी‎ ३० हजार रुपये किंमतीत विक्री‎ करण्याचे सांगितले होते.

त्यानंतर‎ त्यांच्या मावसभावाने याबाबत‎ गजानन भीमराव वऱ्हाडे (रा.‎ नळनी खुर्द, ता. भोकरदन, जि.‎ जालना) यास सांगितले होते.‎ त्यानंतर वऱ्हाडे याने दैवे यांचे‎ खामगाव येथील घर गाठून ‘तुमची‎ दुचाकी विकत घ्यायची आहे. ती‎ मला चालवून पाहू द्या’, असे सांगून‎ तो दुचाकी घेऊन गेला; मात्र तो परत‎ आलाच नाही. त्यामुळे दैवे यांनी‎ पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली.‎ त्यावरुन पोलिसांनी गजानन वऱ्हाडे‎ याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा‎ दाखल केला. घटनेचा तपास‎ पोहेकॉ गजानन जोशी यांनी करीत‎ सदर व्यक्तीस अटक करुन‎ त्याच्याविरुद्ध न्यायालयात दोषारोप‎ पत्र सादर केले. या प्रकरणी ६‎ जानेवारी रोजी खामगाव‎ न्यायालयात सुनावणी करण्यात‎ आली.

सहाय्यक सरकारी‎ अभियोक्ता सविता लोखंडे यांनी‎ अभीयोग पक्षाच्या वतीने एकुण सहा‎ साक्षीदार तपासले. तपास‎ अधिकाऱ्यांची साक्ष व सरकारी‎ अभियोक्ता यांनी केलेला युक्तीवाद‎ ग्राह्य धरुन न्यायाधिश श्रीमती एच.‎ वाय. कवले यांनी गजानन वऱ्हाडे‎ यास एक वर्ष सश्रम कारावासाची‎ शिक्षा सुनावली आहे.‎

बातम्या आणखी आहेत...