आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रामस्थांची मागणी:दुचाकी पुलाखाली कोसळून पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू ; बावणबीर रस्त्यावरील घटना

संग्रामपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

निर्माणाधीन असलेल्या पुलाखाली दुचाकी कोसळून एका बिट जमादाराचा मृत्यू झाला आहे. ही घटना ३ सप्टेंबरला रात्री साडे सात वाजेच्या सुमारास वरवट बकाल ते बावणबीर रस्त्यावर घडली.तामगाव पोलिस ठाण्याअंतर्गत येत असलेल्या चांगेफळ येथे बीट जमादार म्हणून पोलिस कर्मचारी संतोष सुभाषसिंग राजपूत वय ३७ हे कार्यरत होते. दरम्यान शनिवार, ३ सप्टेंबर रोजी सायंकाळी ते एमएच २८ एके २२१७ या क्रमांकाच्या दुचाकीने टुनकीकडून तामगावला येत होते. मात्र वरवट बकाल ते बावनबीर मार्गावर सुरू असलेल्या निर्माणाधीन पुलावरून त्यांची दुचाकी खाली कोसळली.

या अपघातात संतोष राजपतू यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच सोनाळा व तामगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत गंभीर जखमी झालेल्या पोलिस कर्मचाऱ्यास पोलिस व्हॅनमध्ये टाकून वरवट बकाल येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. परंतु तपासणी करून वैद्यकीय अधिकाऱ्यांनी संतोष राजपूत यांना मृत घोषित केले. या अपघातानंतर बांधकाम विभागाकडे अपूर्ण कामे पूर्ण करण्याची मागणी करण्यात येत आहे. या पुलाजवळ आतापर्यंत अनेक अपघाताच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे बांधकाम विभाग व कंत्राटदाराविरुद्ध रोष व्यक्त करण्यात येत आहे. कंत्राटदारासह बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे पोलिस कर्मचारी संतोष राजपूत यांचा नाहक बळी गेला असून, बांधकाम विभाग या रस्त्यावर आणखी किती बळी घेणार असा प्रश्न ग्रामस्थांकडून उपस्थित करण्यात येत आहे. आतातरी बांधकाम विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी या पुलाचे अपूर्ण बांधकाम पूर्ण करण्यासाठी संबंधित कंत्राटदारास आदेश द्यावेत, अशी मागणीही ग्रामस्थ करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...