आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मानवंदना:अपघातात ठार पोलिस कर्मचाऱ्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार ; संजय कुटे यांच्या संवेदना

जळगाव जामोद25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

निर्माणाधीन पुलाखाली दुचाकी कोसळून ३ सप्टेंबर रोजी बीट जमादार संतोषसिंग राजपूत (३७) यांचा मृत्यू झाला. ही घटना वरवट बकाल ते बावनबीर रस्त्यावर घडली होती. सोमवारी त्यांच्यावर शासकीय इतमामात वाडीतील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. संतोषसिंग सुभाषसिंग राजपूत हे ३ सप्टेंबर रोजी एम.एच.२८ एके २२१७ या क्रमांकाच्या दुचाकीने टुणकीकडून तामगाव येथे येत होते. वरवट बकाल ते बावनबीर मार्गावर सुरु असलेल्या निर्माणाधीन पुलावरून त्यांची दुचाकी खाली कोसळली होती. यात त्यांच्या डोक्याला मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्यावर सोमवारी वाडीतील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पोलिस कर्मचाऱ्यांनी बंदुकीच्या तीन फैरी झाडत मानवंदना दिली. यावेळी ठाणेदार सुनील अंबुलकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर भास्कर, पोलिस निरीक्षक विखे, ठाणेदार उलेमाले आदी उपस्थित होते. संतोषसिंग राजपूत यांच्या पुतण्याने पार्थिवास मुखाग्नी दिला. राजपूत यांच्या पश्चात पत्नी, दाेन मुली, आई, वडील, एक भाऊ असा आप्त परिवार आहे. आ. डॉ. संजय कुटे यांनी घरी भेट देवून संवेदना व्यक्त केली.

बातम्या आणखी आहेत...