आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धाडसी चोरी:मलकापूर पांग्रातील पेट्रोलपंपावर दरोडा

मलकापूर पांग्रा/ साखरखेर्डा14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथून काही अंतरावर असलेल्या पंकज भालेराव यांच्या श्रीयान पेट्रोल पंपावर कारमधून आलेल्या चार दरोडेखोरांनी पेट्रोल भरण्याचा बहाणा करून पेट्राेल पंपावर दरोडा टाकला. यावेळी दरोडेखोरांनी कर्मचाऱ्यांना मारहाण करून रोख रकमेसह पावणेतीन लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. या दरोडा प्रकरणातील आरोपी सीसीटीव्हीत कैद झाले असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. ही खळबळजनक घटना २१ नोव्हेंबर रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली.

घटनेची माहिती मिळतात साखरखेर्डा, किनगाव राजा आणि बिबी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून नाकेबंदी केली. येथील पेट्रोल पंप लुटल्यानंतर दरोडेखोर सुलतानपूर येथील कालिंका पेट्रोल पंपावर दरोडा टाकत असताना तेथील कर्मचारी आणि दरोडेखोरांमध्ये झटापट झाली. पंपावरील कर्मचाऱ्यांनी प्रतिकार करताच दरोडेखोर घटनास्थळीच आपले वाहन सोडून पसार झाले. या झटापटीत एक दरोडेखोर जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.

मलकापूर पांग्रा ते बिबी रोडवर पंकज भालेराव यांचा श्रीयान नावाचा पेट्रोल पंप आहे. या पेट्रोल पंपावर काल रात्री साडेनऊच्या सुमारास कारमधून चार दरोडेखोर आले. पेट्रोल न भरता दरोडेखोर केबिनमध्ये घुसले. यावेळी केबिनमध्ये पंप कर्मचारी योगेश पिसे,

सुलतानपूर येथील पेट्रोल पंपावरील दरोडा फसला
मलकापूर पांग्रा येथील पेट्रोल पंपावर दरोडा टाकून दरोडेखोरांनी सुलतानपूर येथे असलेल्या कालिंका पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला. परंतु तेथील तेथील पंप कर्मचाऱ्यांनी प्रतिकार केला. यावेळी झालेल्या हाणामारीत एका कर्मचाऱ्याला दरोडेखोरांनी तीक्ष्ण वार केल्याची माहिती आहे. तर कर्मचाऱ्यांनी देखील दरोडेखोरांशी प्रतिकार करताना त्यांची गाडी फोडली आहे. त्यामुळे दरोडेखोर आपले वाहन सोडून तेथून पसार झाले.

पेट्रोल पंपावरील दहा लाखांची रोकड वाचली
पेट्रोल पंपावर आलेली रोकड दररोज बँकेत जमा करण्यात येते. परंतु लग्न असल्याने पंप मालक पंकज भालेराव व त्यांचा भाऊ सचिन भालेराव हे लग्नासाठी बुलडाणा येथे गेले होते. त्यामुळे त्यांनी दुपारी दहा लाखांची रोकड घरी ठेवली होती. त्यामुळे ही रक्कम बालंबाल वाचली.

लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल
पेट्रोल पंपावर दरोडा टाकणाऱ्या दरोडेखांचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले असून पोलिस अधीक्षक सारंग आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस तपास सुरू असून लवकरच आरोपीला जेरबंद करण्यात येईल.-बळीराम गीते, ठाणेदार स्थानिक गुन्हे शाखा

बातम्या आणखी आहेत...