आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातील प्रमुख परिसर असलेला सावकारपुरा येथील अंबिका अर्बन पतसंस्थेसमोरील सांडपाणी वाहून नेणारी नाली ६ फुट खोल असून अतिशय अरुंद आहे. चुकीने जर एखाद्या या मार्गावरील वाटसरू वा वाहन चालक या नालीत पडला, तर नक्कीच त्याला मोठ्या प्रमाणात दुखापत झाल्याशिवाय राहणार नाही. पालिका प्रशासनाने याकडे त्वरित लक्ष देऊन जीवघेण्या नालीची समस्या त्वरित निकाली काढावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. शहराची मुख्य बाजारपेठ ही सावकारपुरा परिसरापासूनच सुरू होते. या भागात मुख्य बाजारपेठ असल्यामुळे नागरिकांची नेहमीच वर्दळ असते.
आताच्या नवीन शहराच्या विकासात बऱ्याच नाल्या या बंदिस्त आहेत, परंतु येथील नाही ही बंदिस्त तर नाहीच उलट प्रमाणापेक्षा खोल असून अरुंद आहे. ही नाली फार जुनी आहे. पुर्वी रस्त्याची उंची कमी होती. मात्र दिवसेंदिवस शहर विकासामध्ये रस्त्याची कामे होत गेल्याने त्यांची उंची सतत वाढत राहिली. नाली मात्र जुनीच राहिली. त्यामुळे ती अधिकाधिक खोल व अरुंद होत गेली. खोल ही एवढी झाली एखादा व्यक्ती त्यात पडला, तर त्यांच्या उंचीपेक्षा नक्कीच खोल असल्याने कोणाला दिसणार सुध्दा नाही.
शहरातील प्रमुख मार्गावरील नाली अजूनपर्यंत दुर्लक्षित कशी राहिली, याकडे प्रशासनाचे लक्ष नाही का, असे अनेक प्रश्न नागरिकांना या नालीकडे पाहून भेडसावत आहेत. पालिका प्रशासनाने या नालीकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. एका व्यक्तीची मोडली होती कंबर : चार ते पाच वर्षांपूर्वी ग्रामीण भागातील एक व्यक्ती नातेवाइकाकडे आला असता, नजर चुकीने या नालीत पडला होता. तेव्हा त्याच्या कंबरेला जबर दुखापत झाली होती.
प्रशासनाकडून उपाययोजना आवश्यक हा मार्केट लाईनमधला मार्ग असून या मार्गावर खोल नाली अपघातास कारणीभूत ठरत आहे. येथून बाजारपेठेत खरेदी करण्यासाठी नागरिकांची सतत ये-जा सुरू असते. सोबत लहान मुले सुध्दा असतात. अशा खोल नालीत एकदा लहान मुलगा पडला वा एखादे वाहन अनियंत्रित होवून पडल्यास होणाऱ्या अपघाताला जबाबदार कोण राहील? नगरपालिका प्रशासनाने या नालीच्या समस्येवर उपाययोजना करणे आवश्यक आहे. - आनंद सारडा, सामाजिक कार्यकर्ता
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.