आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपक्रम‎:सेवा संकल्पातील मनोरुग्णांच्या‎ चेहऱ्यावर फुलवले हास्य‎

बुलडाणा‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील सेवानिवृत्त पोलिस उपनिरीक्षक‎ संतोष नेमणार यांनी चिखली‎ तालुक्यातील पळसखेड सपकाळ‎ येथील सेवासंकल्प प्रतिष्ठान मधील‎ २०५ मनोरुग्णांच्या चेहऱ्यांवर सेवानिवृत्त‎ नेमणार यांनी हास्य फुलवले आहे.‎ आपल्याच कुटुंबातील सदस्यांची‎ जिवाभावाची नाळ सैल झाल्याने‎ दारोदार भटकंती करण्याचा प्रसंग या‎ मनोरुग्णांवर ओढावला. दारोदार‎ भटकंती करणाऱ्या मनोरुग्णांचे आधार‎ बनलेले डॉ. नंदकुमार पालवे दाम्पत्य‎ सन २०११ पासून सेवा संकल्प‎ प्रतिष्ठानाला प्रारंभ केल्या आहे.‎

मध्यंतरी कोरोना महामारीतील अनेक‎ अडथळ्याची शर्यत पार करीत‎ सेवाभावी प्रकल्पाचे ध्येय विचलित‎ होऊ दिले नाही. त्यांच्या या सेवाभावी‎ उपक्रमामध्ये खारीचा वाटा‎ उचलण्याच्या उदात्त हेतुने सेवानिवृत्त‎ पोलिस उपनिरीक्षक संतोष नेमणार,‎ संगीता नेमणार, डॉ. चैताली नेमणार,‎ डॉ. सौरभ नेमणार यांनी सेवा संकल्प‎ प्रतिष्ठान मधील रुग्णांना अन्नदान करत‎ मनमोकळा वार्तालाप केला. यावेळी‎ सेवा संकल्प प्रतिष्ठानचे डॉ. पालवे‎ दाम्पत्यांनी कार्यक्रमास उपस्थित सर्वांचे‎ आभार मानले.‎

बातम्या आणखी आहेत...