आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धडक:भरधाव पोलिस व्हॅनची तीन वाहनांना धडक

खामगाव16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाहतुकीचे नियम शिकवणाऱ्या पोलिस विभागातील एका पोलिस कर्मचाऱ्याने दारूच्या नशेत तर्रर्र होऊन आपल्या ताब्यातील पोलिस व्हॅनने तीन वाहनांना उडवल्याची घटना शुक्रवार, १८ नोव्हेंबर रोजी रात्री नांदुरा रोडवर घडली. त्यामुळे या पोलिस कर्मचाऱ्यावर वरिष्ठ अधिकारी काय कारवाई करतात, या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे. येथील शिवाजी नगर पोलिस ठाण्यात कार्यरत पोलिस कर्मचारी कैलास हटकर हा काल रात्री दारूच्या नशेत तर्रर्र होऊन पोलिस वाहन चालवत होता.

दारू ढोसलेली असल्यामुळे त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले व त्याने तीन वाहनांना धडक दिली. ही घटना नांदुरा रोडवरील ‘हॉटेल गौरव’ जवळ घडली. यावेळी काही नागरिकांनी मद्यधुंद पोलिस कर्मचारी हटकर याचे व्हीडीओ चित्रीकरण सुध्दा केले

बातम्या आणखी आहेत...