आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोसळले:भरधाव जाणारे स्कॉर्पिओ वाहन पुलाखाली कोसळले

जळगाव जामोद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भरधाव जाणाऱ्या स्कॉर्पिओ वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे स्कॉर्पिओ वाहन पुलाखाली कोसळले. या अपघातात वाहनातील एकालाही दुखापत झाली नसली तरी वाहनाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. ही घटना ८ डिसेंबर रोजी दुपारच्या सुमारास जळगाव जामाेद सुनगाव मार्गावर घडली.

तालुक्यातील सुनगाव येथील रवी धुळे यांच्या मालकीची (एम. एच. १५ /बीके / ०९०९ या क्रमाकांची) महिंद्रा स्कार्पियोने चालक अमोल भगत हे सुनगाव कडून जळगाव जामोद कडे येत होते. फरशी पुलाच्या नाल्याजवळ येताच त्यांचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे वाहन पुलाखाली जाऊन कोसळले.

या अपघातात कुठलीही जीवीत हानी झाली नसली तरी वाहनाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. दरम्यान, अपघात घडताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन पुलाखाली पडलेली स्कॉर्पिओ जेसीबीच्या साह्याने बाहेर काढली.

बातम्या आणखी आहेत...