आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:भरधाव ट्रकची दुचाकीला जबर धडक; अपघात एक ठार, १ जखमी

नांदुरा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भरधाव ट्रकने समोरुन येणाऱ्या दुचाकीस जबर धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील एक जण जागीच ठार झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला. ही घटना राष्ट्रीय महामार्गावरील वडनेर भोलजी येथील पुलावर शुक्रवारी घडली. गोपाळ संजय सातव (२८) रा. वाघूड असे मृताचे नाव आहे. तर सुनील मधुकर सातव असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

तालुक्यातील वाघुड येथील गोपाळ सातव व सुनील सातव हे दोघे एमएच २८ बीई २५८५ या क्रमांकाच्या दुचाकीने नांदुऱ्यावरून मलकापूरकडे जात होते. वडनेर भोलजी पुलावर येताच त्यांच्या दुचाकीला समोरुन भरधाव येणाऱ्या एमएच ०४ एचएस १४५९ या क्रमांकाच्या ट्रकने जबर धडक दिली. या अपघातात डोक्याला जबर मार लागल्याने गोपाळ सातव यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

या अपघाताची माहिती मिळताच ओम साई फाउंडेशनचे स्वयंसेवक विलास निंबोळकर, पीयूष मिहानी, श्रीकृष्णा नालट, सचिन पुंडे, आनंद वावगे, वडनेर पोलिस चौकीचे एपीआय प्रवीण मानकर, पोलिस कर्मचारी संजय निंबोळकार व वडनेर भोलजी प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी संदीप सातव हे रुग्णवाहिकेसह घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर अपघातातील जखमीला येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारार्थ दाखल केले. परंतु जखमीची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्यास पुढील उपचारासाठी मलकापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. घटनास्थळी ठाणेदार अनिल बेहराणी यांनी भेट देऊन पाहणी केली.

बातम्या आणखी आहेत...