आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्ह्यातील कॅफेमध्ये गैरवर्तन होत असल्याची तक्रार जिल्हाधिकारी यांना देऊन जिल्हा पोलिस अधीक्षकांना भेटण्यासाठी गेलेल्या सकल मराठा समाजाच्या नेत्यांना जिल्हा पोलिस अधीक्षकांनी अपमानास्पद वागणूक दिल्याची घटना आज घडली. हा प्रकार पत्रकारांसमोरच घडला. यावेळी एस पी सारंग आव्हाड यांनी पत्रकार येथे कशासाठी? तुम्हाला शो करायचा का? असा सवाल केला. शहरातील कॅफेवर कॅफेच्या नावाखाली मुला-मुलींचे गैरप्रकार वाढले असून मुलींना मोहपाशात ओढण्यासाठी कॅफेचा वापर होत असल्याचे बाब पुढे आणली. कॅफेमध्ये पलंग व केबिन असल्याचे बाबही त्यांनी निदर्शनास आणून दिली. यासंदर्भात निवेदन देण्यासाठी शिष्टमंडळ गेले असता एस पी सारंग आवाड यांनी भावना समजून घेण्याऐवजी आवाज चढवीत प्रश्नांची सरबत्ती केली.
असा आरोप सकल मराठा समाजाच्या वतीने केली जात आहे. मराठा समाजाची दुसरी घटना सिंदखेड राजा येथे १२ जानेवारी रोजी जिजाऊ जन्मोत्सव साजरा होतो. येथे पोलिसांना दंगल घडवायची होती. यासाठी जिजाऊ भक्तांना डिवचण्यात आले असा गंभीर आरोप शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर यांनी यापूर्वीच केला आहे. तर आज सकल मराठा समाजाला उद्धट वागणूक देण्यात आली.
शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांवर लाठिचार्जची घटना राज्यभर गाजत आहे व आज सकल मराठा व पत्रकारांना दिलेल्या भूमिकेवरून देखील प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. शांत संयमी जिल्ह्यात यामुळे संतप्त भावना आहे. जिल्ह्यात सर्वत्र अवैध धंदे सुरू आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न आहे. मात्र पोलिस अधीक्षक निवेदन देण्यासाठी आलेल्या लोकांनाच प्रश्न विचारू लागले आहे, असेही सकल मराठा समाजाच्या वतीने सांगितले जात आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.